पौष्टिक आलु पराठा झटपट तयार करा | Aloo Paratha Recipe In Marathi
आलु पराठा हे भारतीय उपखंडातील मूळ भाकरी डिश आहे. ही एक नाश्त्याचा प्रकार आहे, जास्त करून पंजाब प्रदेशात खाल्ले जाते. Aloo Paratha Recipe In Marathi हि पाककृती भारताच्या पश्चिम, तसेच मध्य आणि उत्तर भागांमध्ये प्रसिद्ध पदार्थांपैकी आलु पराठा आहे.
लोक परिपूर्ण आलु पराठा बनवण्यासाठी प्रयत्न करतात. कारण ते बनवताना तुटते आणि भरणे (सारण) बाहेर पडते. परंतु, या अत्यंत सोप्या आलू पराठा रेसिपी सरावाने जमते, आपण सर्वोत्तम पराठे बनवू शकता.
Aloo Paratha Recipe In Marathi (आलु पराठा)
प्रकार १
आलु पराठासाठी साहित्य
७-८ (अर्धा किलो) उकडलेले बटाटे
१०-१५ हिरव्या मिरच्या
पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
१ इंच आल्याचा तुकडा
८-१० लसूण पाकळ्या
३ चमचे मीठ
१ चमचा साखर
अर्धे लिंबू
३ भांडी कणिक
पाव वाटी तेल पराठा भाजण्याकरता


aloo paratha recipe in marathi खाली आपण दोन प्रकारे step by step कसा करायचा पाहणार आहे.
Step 1
प्रथम कणकेत एक चमचा तिखट, पाव चमचा हळद, पाव वाटी बेसन, दीड चमचा मीठ, दोन डाव तेल घालून किंचित सैलसरच कणिक भिजवा. तेलाच्या हाताने मळून झाकून ठेवा.
Step 2
सारणासाठी उकडलेले बटाटे किसणीवर किसावेत. हिरव्या मिरच्या, आले, लसूण बारीक वाटून घ्यावे.
किसलेल्या बटाट्यात चिरलेली कोथिंबीर वाटण, मीठ, साखर व लिंबाचा रस घालून गोळा एकजीव करून घ्यावा.
Step 3
कणिक तेलाचा हात लावून चांगली मळून घ्यावी. एक मोठ्या लिंबाएवढी कणिक घ्यावी. त्याच्या बरोबरीने किंवा दीडपट सारणाचा गोळा घ्यावा.
Step 4
पुरणाच्या पोळीप्रमाणे कणकेत सारण भरून पिठावर हलक्या हाताने फुलक्याएवढा आकाराचा पराठा लाटावा.
Step 5
तेलाचा हात लावून तव्यावर टाकावा. दोन्ही बाजूने प्रथम कोरडा भाजावा, नंतर थोडेसे तेल सोडून खमंग भाजावा. अशा पद्धतीने वरती तुम्ही aloo paratha recipe in marathi बनवायला शिकलात.
झटपट उपवासाचे थालीपीठ सोप्या पद्धतीने
आलु पराठा टीप
punjabi aloo paratha recipe । paratha
आवडत असल्यास सारणात मोठा कांदा किसून घालावा. त्याने सारण सलसर होते.
सारण बनवताना, पराठे बनवण्यापूर्वी एक तास आधी बटाटे मॅश करण्याचा प्रयत्न करा.
गुळगुळीत आणि कोरडे नसलेले लवचिक पीठ मळून घ्यावे. एकदा ते मळून घेतले की ओलसर कापडाने झाकून १५-२० ठेवावे. यामुळे कणिक आलू पराठ्यासाठी एकदम परिपूर्ण होईल.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे वापरलेला बटाटा लगेच उकडलेला नसावा. नेहमी थंड बटाटे वापरणे आवश्यक आहे.
प्रकार २
आलु पराठासाठी साहित्य
८-१० लसूण पाकळ्या
३ चमचे मीठ
१ चमचा साखर
अर्धे लिंबू
३ भांडी कणिक
पाव वाटी तेल पराठा भाजण्याकरता
७-८ (अर्धा किलो) उकडलेले बटाटे
१०-१५ हिरव्या मिरच्या
पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
१ इंच आल्याचा तुकडा
आलु पराठा कसा करायचा
aloo paratha recipe in marathi दुसरी पद्धत खाली step by step पाहणार आहे.
Step 1
प्रथम बटाटे उकडून घ्यावेत. ते किसणीवर किसावेत. हिरव्या मिरच्या, आले, लसूण बारीक वाटून घ्यावे.
Step 2
एक कांदा किसणीवर किसावा. किसून घेतलेल्या बटाट्यात वाटलेले वाटण, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, साखर, किसलेला कांदा व लिंबाचा रस घालून सर्व मळावे.
Step 3
नंतर त्यात मावेल एवढी कणिक घालावी. साधारण सहज लाटता येईल इतपत कणिक घटट् भिजवावी, नंतर तेलाचा हात लावून मळावे.
Step 4
कणकेवर किंवा तांदळाच्या पिठीवर घडी न घालता फुलका करतो त्याप्रमाणे लहान-मोठा जसा जमेल तसा पराठा लाटावा.
थोडे तेल सोडून पराठा तव्यावर भाजावा. तूप घालून चटणी किंवा लोणच्याबरोबर खावयास द्यावा.
निष्कर्ष आलु पराठा
आता आपण पाहिले आहे, Aloo Paratha Recipe In Marathi (आलु पराठा). आपण बनवायला शिकलो aloo paratha. आम्ही आशा करतो कि तुम्हाला हि रेसिपी खूप आवडली असेल. आपणास ही रेसिपी आवडली असल्यास, Comment करण्यास आणि Share करण्यास विसरू नका. Homepage भेट द्या.
Pingback: सोपी पद्धत पूरण पोळी • Puran Poli Marathi Recipe - Marathi Recipe