Aluchi Bhaji Recipe in Marathi | अळूची भाजी बनवा – मराठी रेसिपी
नमस्कार, Aluchi bhaji recipe in marathi आज आपण बनवायला शिकणार आहोत. यासाठी कोणते साहित्य लागते? कृती कशी करायची? हे सर्व खाली दिले आहे. म्हणून तुम्ही हा ब्लॉग पूर्ण वाचा.
Aluchi Bhaji Recipe in Marathi

साहित्य
अळूच्या चार पानाची जुडी घावे. चुका अगदी छोटी गड्डी, शेंगदाणे पाव वाटी, हरबरा डाळ एक डाव, असल्यास थोडेसे काजूचे तुकडे, (मोठ्या लिंबाएवढी चिंच-चुका न मिळाल्यास), पाव वाटी गूळ, दहा-बारा हिरव्या मिरच्या, एक मोठा चमचा मीठ, ओल्या खोबऱ्याचे तुकडे एक डाव किंवा सुक्या खोबर्याचे.
अर्धा मुळा, काळा मसाला एक डाव, डाळीचे पीठ पाव वाटी, पाव वाटी तेल फोडणीकरता (मेथ्या, हिंग, हळद, मोहरी, जिरे – फोडणीचे साहित्य) एक चमचा साखर , डाळ, दाणे, काजू आधी भिजत टाकावेत.
कृती
प्रथम अळूची देठे बाजूला काढावीत. ती सोलून घ्यावीत. त्याचे बारीक तुकडे करावेत मग पाने बारीक चिरून घ्यावीत. त्यातच चुक्याची पाने निवडून चिरून टाकावीत. सर्व स्वच्छ धुऊन घ्यावे. एक चमचा तेलावर भाजी तासभर आधी भिजत टाकलेले डाळ, दाणे, काजू मुळ्याचे काप, अर्धी वाटी पाणी घालून शिजवून घ्यावी. अळू भाजी घोटून घ्यावी. त्यात डाळीचे पीठ घालावे.
आता तेलाची फोडणी करून मिरच्याचे तुकडे, मेथ्या टाकाव्यात. त्यात भाजी ओतावी. काळा मसाला घालावा. साधारणपणे तीन वाट्या गरम पाणी भाजीत घालावे. कोळून घेतलेले चिचेचे पाणी, गूळ, मीठ, साखर घालावी व भाजी पाच मिनिटे चांगली शिजू द्यावी. ही भाजी जरा दाटच छान लागते. नाहीतर थोडे पाणी जास्त घालावे. चुका नसेल तर चिच घालूनही भाजी चांगली लागते. तसेच चुका घालून सुद्धा चवीपुरती चिंच कोळून घालण्यास हरकत नाही. मात्र गुळाचे प्रमाण वाढवावे.
चाकवताची भाजी | Chakwat Bhaji Recipe in Marathi – मराठी रेसिपी
सुरणाची भाजी | Suranachi Bhaji Recipe in Marathi – Marathi Recipe
वांगी भाजी | Vangi Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe
बटाटा भाजी | Batata Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe
Conclusion
आत्ता आपण पाहिलं कि Aluchi Bhaji Recipe in Marathi कशी बनवायची. यामध्ये आपण कृती करून बनवायला शिकलो. वरती तुम्ही वाचलात असालच. असच या वेबसाइटला भेट देतजा अशी विनंती. ही रेसिपी आवडली असेल तर Comment आणि Share करायला विसरू नका.
Pingback: अंबाडीची भाजी बनवायला शिका | Ambadi Bhaji - मराठी रेसिपी
Pingback: Annietur (annietur123) | Pearltrees
Pingback: Aloo Palak Recipe In Marathi • आलू पालक रेसिपी - Marathi Recipe
Pingback: Chakali Recipes In Marathi • झटपट कुरकुरीत खमंग चकली रेसिपीस
Pingback: Shankarpali Recipe In Marathi • स्वादिष्ट आणि खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी
Pingback: Chakali Bhajani Recipe In Marathi • झटपट खमंग चकली भाजणी रेसिपी
Pingback: Alu Vadi Recipe In Marathi • बेस्ट कुरकुरीत अळू वडी रेसिपी • Alu Vadi Marathi
Pingback: Marathi Recipes Kothimbir Vadi • खुसखुशीत खमंग कोथिंबीर वडी रेसिपी