Aluchi Patal Bhaji | अळूची पातळ भाजी

रेसिपी Share करा 👇

अलूची पातळ भाजी ही महाराष्ट्रीयन असून पौष्टिक आहे. Aluchi Patal Bhaji बनवण्यासाठी साहित्य खाली दिले आहे. चला शिकूया भाजी बनवायला. 

Aluchi Patal Bhaji (अळूची पातळ)

साहित्य 

३ अळूच्या जुड्या (१ जुडीत ७ ते ८ पाने) 

१ चुका जुडी, १ मुळा

३ वाटी हरभऱ्याची डाळ

१/२ वाटी कच्चे शेंगदाणे

थोडे सुख्या खोबऱ्याचे काप

१ लिंबाएवढी चिंच

४-५ हिरव्या मिरच्या

१/२ वाटी ओले खोबरे

१/२ चमचा मेथी

थोडासा कढीलिंब, कोथिंबीर

तिखट, मीठ

गूळ, काळा मसाला.

Aluchi Patal Bhaji | अळूची पातळ भाजी - Marathi Recipe

अळूची पातळ भाजी कृती?

आदल्या दिवशी रात्री हरभऱ्याची डाळ व दाणे वेगवेगळे भिजत घालावेत. अळूची पाने ओल्या फडक्याने पुसून घ्यावीत व बारीक चिरावीत. 

देठी सोलून बारीक चिरावी. चुकाही बारीक चिरावा. मुळा मध्यभागी उभा चिरून त्याचे काप करावेत. नंतर सर्व भाज्या धुवून निथळत ठेवाव्यात.

एका पातेल्यात डावभर तेल घालून त्यावर वरील अळूचा पाला, देठी वगैरे घालून जरा परतावे. नंतर एका बेताच्या पातेल्यात भिजलेले दाणे, डाळ, खोबऱ्याचे काप, काजू, मिरच्या व परतलेला अळूचा पाला घालावा.  

थोडे पाणी घालून ही पातेली साध्या किंवा प्रेशर कुकरात ठेवून, भाजी शिजवून घ्यावी.

भाजी शिजवल्यावर, वरचे पाणी बाजूला काढून, भाजी गरम आहे, तोच डावेने घोटून घ्यावी. भाजी घोटतानाच त्यात मोठे डावभर डाळीचे पीठ घालावे.

नंतर मोठ्या पातेल्यात हिंग, मोहरी, हळद घालून जरा जास्त तेलाची फोडणी करावी. फोडणीतच मेथी व कढीलिंब घालावा. त्यावर वरील घोटलेली भाजी घालावी. नंतर त्यात पाणी घालून ढवळावे. 

पुढे त्यात चिंचेचा कोळ, तिखट, मीठ, थोडा काळा मसाला व गुळ घालून ढवळावे. भाजी फार पातळ नको व फार दाट नको, अशी असावी. 

नंतर त्यात कोथिंबीर व ओले खोबरे घालून चांगल्या चार उकळ्या येऊ द्याव्यात. प्रखर विस्तवावर भाजी जरा आटली, की डाळीचे पीठ शिजते व चिंचेचा उग्रपणा कमी होतो. 

ताटात डावेने वाढल्यास भाजीचा ओघळ जाणार नाही. इतपत दाट झाली, की उतरवावी. भाजी शिजत लावण्यापूर्वी थोड्या तेलावर परतणे आवश्यक आहे. 

चुका घातल्यामुळे भाजी मिळून येते व जास्त चवदार लागते. वरील प्रमाणाने केलेली अळूची पातळ भाजी ८ ते १० माणसांना चांगली पुरते.

हे पण वाचा,

कटाची आमटी | Katachi Amti Recipe in Marathi – मराठी रेसिपी

मस्त हॉटेल सारखा सांबर बनवायला शिका | Sambar Recipe In Marathi

Turichya Dalichi Amti | तुरीच्या डाळीची आमटी

Tomato Soup Recipe In Marathi | टोमॅटो सूप रेसिपी

Literature (Aluchi Patal Bhaji)

3 Alu’s Judy

1 Chuka Judy, 1 radish

3 cups gram dal

1/2 cup raw peanuts

Slightly dry coconut slices

1 tadpole

4-5 green chilies 

1/2 cup wet coconut

1/2 tsp fenugreek

A little curry, cilantro

Chili powder, salt

Jaggery, black spice.

Aluchi Patal Bhaji?

The night before, soak the gram dal and seeds separately. Wipe the aloo leaves with a damp cloth and chop finely.

Peel a squash, grate it and chop finely. Chop finely. Cut the radish vertically in the middle. Then wash and drain all the vegetables.

In a bowl, add oil to the left side, add aloo leaves, stalks, etc. and fry for a while. Then in a bowl, add soaked seeds, dal, coconut slices, cashews, chilies, and fried aloo leaves.

Add a little water and cook the vegetables in a simple or pressure cooker. 

When the vegetables are cooked, remove the water from the top and knead with the left hand. While stirring the vegetables, add a large bowl of dal flour.

Then in a large bowl, add asafoetida, mustard seeds, turmeric powder, and stir well. Add fenugreek and curry leaves. Add chopped vegetables on top. Then add water and stir.

Add tamarind pulp, red chili powder, salt, some black masala, and jaggery and mix well. Vegetables should not be too thin or too thick.

Then add cilantro and wet coconut and bring to a good boil. Simmer the vegetables on a high flame, so that the dal flour is cooked and the tamarind becomes less pungent.

If left on the tray, the vegetables will not overflow. It has become so thick that it should be removed. The vegetables need to be fried in a little oil before cooking.

Adding Chuka vegetables makes the vegetables more palatable. Aluchi Patal Bhaji (vegetables) made in the above proportions are good enough for 8 to 10 people.

Kadhi Recipe In Marathi | कढी रेसिपी

Conclusion

Now we have seen How to make Aluchi Patal Bhaji (अळूची पातळ भाजी). We learned to make (Aluchi Patal Bhaji). If you like this recipe, don’t forget to comment and share. Visit Home Page.


रेसिपी Share करा 👇

4 thoughts on “Aluchi Patal Bhaji | अळूची पातळ भाजी

Leave a Reply

Your email address will not be published.