अंबाडीची भाजी बनवायला शिका | Ambadi Bhaji – मराठी रेसिपी

रेसिपी Share करा 👇

नमस्कार, Ambadi Bhaji आज आपण बनवायला शिकणार आहोत. अंबाडी भाजीचे खूप फायदे आहेत. हि भाजी खाल्याने रक्तदाब नियंत्रित राहते. वजन कमी होते. डोळ्यांसाठी अंबाडी भाजी चांगली असते. तसेच याचे बरेच फायदे आहेत. कोणते साहित्य लागते? कृती कशी करायची? हे सर्व खाली दिले आहे. चला पाहू अंबाड्याची भाजी. 

Ambadi bhaji कशी बनवतात

अंबाडीची भाजी बनवायला शिका | Ambadi Bhaji - मराठी रेसिपी

साहित्य 

अंबाडीची भाजी एक मोठी जुडी घावे. तांदूळ अगर जोंधळ्याच्या कण्या, शेंगदाणे, हरबरा डाळ, डाळीचे पीठ एक मोठा डाव, मीठ, हिरव्या मिरच्या आठ दहा अगर लाल वाळलेल्या मिरच्या दोन्ही नसेल तर लाल तिखट दोन चमचे घावे. लसूण लहान गड्डी, एक कांदा, फोडणीकरता तेल अर्धी वाटी, गुळ दोन डाव, हरबरा डाळ व शेंगदाणे दोन तास आधी भिजत घालावेत.

कृती 

प्रथम भाजी निवडून बारीक चिरावी. स्वच्छ धुऊन उकडून घ्यावी. भाजी आंबट वाटत असल्यास त्याचे पाणी काढून टाकावे. शिजवताना त्यातच तांदळाची कणी अर्धी वाटी घालावी. नसेल तर आपण भात शिजवतो. त्यातलाच एक मोठा डाव भाजी शिजवून घेतल्यावर घालावा. पाव वाटी तेल तापत ठेवावे. त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. 

मिरच्या टाकाव्यात कांदा बारीक चिरून, अर्धा गड्डी सोललेला लसूण फोडणीत परतून घ्यावा. नंतर पीठ लावलेली भाजी ओतावी. मीठ, गूळ घालावा. अर्धी वाटी पाणी टाकून भाजी सारखी करावी. व मंद गॅसवर शिजू द्यावी. भाजी शिजत असतानाच एकीकडे उरलेल्या पाव वाटी तेलाची फोडणी करावी. त्यात अर्धा गड्डी लसूण सोलून घालवा. भाजी झाल्यावर ही फोडणी वरून ओतावी.

या भाजीप्रमाणेच करडईची भाजी करतात. फक्त या भाजीला अंबाडीच्या भाजीपेक्षा गूळ कमी लागतो. तसेच यात हरबरा डाळ व तांदळाच्या कण्यांऐवजी तूरडाळही चांगली लागते.

Alu Vadi Recipe In Marathi | अळू वडी रेसिपी

Aluchi Bhaji Recipe in Marathi | अळूची भाजी बनवा – मराठी रेसिपी

चाकवताची भाजी | Chakwat Bhaji Recipe in Marathi – मराठी रेसिपी

Conclusion 

आत्ता आपण पाहिलं कि Ambadi Bhaji कशी बनवायची. यामध्ये आपण कृती करून बनवायला शिकलो. वरती तुम्ही वाचलात असालच. असच या वेबसाइटला भेट देतजा अशी विनंती. ही रेसिपी आवडली असेल तर Comment आणि Share करायला विसरू नका.


रेसिपी Share करा 👇

3 thoughts on “अंबाडीची भाजी बनवायला शिका | Ambadi Bhaji – मराठी रेसिपी

Leave a Reply

Your email address will not be published.