बटाटा भाजी | Batata Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe
नमस्कार, Batata Bhaji Recipe in Marathi, बटाट्याची भाजी कशी केली पाहिजे हे आपण आज पाहणार आहोत. बटाटा भाजी बनवायचे अनेक प्रकार आहेत. या पोस्ट मध्ये बटाटा भाजी चे दोन प्रकार पाहणार आहोत. तुम्हाला कोणत्या प्रकाराने भाजी बनवायला आवडते त्या पद्धतीने बनवू शकता. चला पाहूया बटाटा भाजी रेसिपी मराठी मध्ये.

प्रकार १
साहित्य : अर्धा किलो बटाटे, चार ते पाच हिरव्या अगर लाल मिरच्या, चहाचा पाव चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, असल्यास कढीलिंब, फोडणीसाठी एक डाव तेल, मोहरी, थोडी हळद.
कृती
प्रथम बटाटे उकडून घ्यावेत. बटाटे मोठ्या आकाराचे असतील तर दोन भाग करावेत. म्हणजे लवकर उकडतात. नंतर त्याच्या बारीक फोडी कराव्यात. साधारण एक मोठ्या डाव तेलाची प्रथम मोहरी घालून ती तडतडल्यावर हिंग, कढीलिंबाची दहा-बारा पाने घालून फोडणी करावी. फोडणीत मिरच्यांचे तुकडे व पाव चमचा (मिसळण्याच्या डब्यातील) हळद टाकावी.
नंतर फोडी टाकून पाच मिनिटे मंद आचेवर ठेवावे. भाजी वाढताना खोबरे, कोथिंबीर घालून वाढावी. ओले खोबरे घातलेली भाजी जास्त वेळ राहिल्यास चिकट होते. तसेच यात आवडत असल्यास एक मोठा कांदा चिरून फोडणीत प्रथम लाल करून घ्यावा. डोश्याची भाजी करताना फोडणीत एक चमचा उडदाची डाळ घालावी. मटारच्या सीझनमध्ये सोललेला मटार अर्धी वाटी घातल्यास छान लागतो. भाजीही छान दिसते.
Batata Bhaji Recipe in Marathi/ बटाट्याची भाजी
प्रकार २
साहित्य : अर्धा किलो बटाटे, चार ते पाच हिरव्या अगर लाल मिरच्या, चहाचा पाव चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, फोडणीसाठी एक डाव तेल, मोहरी, थोडी हळद, असल्यास कढीलिंब.
कृती
बटाट्याची सालं काढावीत. एका बटाट्याचे चार भाग करून पातळ चकत्या कराव्यात. दीड डाव तेलाची फोडणी करून त्यात हळद, मिरच्या, कढिलिंब टाकावा. नंतर बटाट्याच्या चकत्या टाकाव्यात. हाताने पाण्याचा शिपका द्यावा व मंद आचेवर झाकण ठेवून शिजू द्यावी. मधूनच झाकण काढून भाजी हालवावी. म्हणजे बुडाशी लागत नाही.
फोडी मऊ झाल्यावर त्यात मीठ, चवीला साखर घालावी. एक वाफ देऊन खाली उतरवावी. भाजी गार झाल्यावर झाकून ठेवावी. वरून कोथिंबीर, खोबरे पसरवावे. यातही आवडत असल्यास कांदा, ओला मटार घालावा. तसेच मिरचीऐवजी एक चमचा लाल तिखट घालावे. त्यानंही रंग छान येतो. पाण्याचा शिपका मारल्याने कमी तेलावरसुद्धा भाजीची फोड मउ शिजते.
साखर भात | Sakhar Bhat Recipe in Marathi | भात पुलाव – Marathi Recipe
झटपट पुलाव | Pulav Recipe in Marathi | भात पुलाव – Marathi Recipe
चिकन टिक्का | Chicken Tikka Recipe in Marathi – Marathi Recipe
लिंबू लोणचे । Limbu Lonche Recipe in Marathi – Marathi Recipe
सुरणाची भाजी | Suranachi Bhaji Recipe in Marathi | – Marathi Recipe
वांगी भाजी | Vangi Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe
Conclusion
आपण आत्ता पाहिलं कि बटाट्याची भाजी कशी केली पाहिजे, Batata Bhaji Recipe in Marathi. तुम्हाला हि रेसिपी आवडली असेल तर Comment करायला विसरू नका.
Pingback: वांगी भाजी | Vangi Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe
Pingback: सुरणाची भाजी | Suranachi Bhaji Recipe in Marathi | – Marathi Recipe
Pingback: लिंबू लोणचे । Limbu Lonche Recipe in Marathi - Marathi Recipe
Pingback: चिकन टिक्का | Chicken Tikka Recipe in Marathi - Marathi Recipe
Pingback: झटपट पुलाव | Pulav Recipe in Marathi | भात पुलाव - Marathi Recipe
Pingback: साखर भात | Sakhar Bhat Recipe in Marathi | भात पुलाव – Marathi Recipe
Pingback: Marathirecipe | Pearltrees
Pingback: कारल्याची भाजी • Karlyachi Bhaji In Marathi - Marathirecipe.net
Pingback: Annietur (annietur123) | Pearltrees
Pingback: मस्त हॉटेल सारखा सांबर बनवायला शिका • Sambar Recipe In Marathi
Pingback: Chakwat Bhaji Recipe In Marathi । चाकवत भाजी आंबट-तिखट रेसिपी
Pingback: Shankarpali Recipe In Marathi • स्वादिष्ट आणि खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी