Chicken Fry Recipe In Marathi | चिकन फ्राय रेसिपी मराठी

रेसिपी Share करा 👇

खूप चविष्ट आणि क्रिस्पी खाणाऱ्यांसाठी हा फ्राय आहे. एक मधुर भूक, जेवणाच्या मेजवानीसाठी योग्य. सोबत तांबडा-पांढरा रस्सा असेल तर चिकन फ्रायसारखा चविष्ट पदार्थ दुसरा नाही. Chicken Fry Recipe In Marathi तुम्ही पण ट्राय करा. खाली आपण ४ प्रकारे चिकन फ्राय करायला शिकणार आहे. 

कुरकुरीत आणि चवदार Chicken Fry Tips

चिकन स्वच्छ धुवा.

आपल्या उष्णतेच्या पसंतीनुसार मसालेदारपणा समायोजित करा.

पॅन ओव्हरलोड करू नका, त्यांना बॅचेसमध्ये तळून घ्या.

चिकन फ्राय करून पहा. हे कसे करावे हे जाणून घेऊया. 

Chicken Fry Recipe In Marathi | चिकन फ्राय रेसिपी मराठी - Marathi Recipe

Chicken Fry Recipe In Marathi (चिकन फ्राय)

चिकन फ्राय प्रकार १ 

चिकन फ्राय रेसिपीसाठी साहित्य

अर्धा किलो चिकन

१ वाटी मैदा

१ अंडे

१ वाटी दूध

१ मोठा चमचा वितळून घेतलेले लोणी

तळण्यासाठी तेल

अर्धे लिंबू

मसाला १/४ चमचा काळी मिर पूड.

चिकन फ्राय कृती

Step 1

चिकनचे मोठे तुकडे करावेत. धुऊन त्याला मीठ लावून लिंबू पिळून ठेवावे. हे तुकडे थोडा वेळ मुरु द्यावेत. 

Step 2

नंतर पातेल्यात तसेच मध्यम अग्नीवर शिजायला ठेवावेत. शिजवताना झाकण ठेवावे. 

Step 3

पाणी चांगले आटवून घ्यावे. पाणी आटले, की पातेले खाली उतरवून घावे. दूध, मैदा, लोणी, अंडे, थोडे मीठ, काळी मिरी घालून मिश्रण चांगले भरपूर फेटून घ्यावे. 

Step 4

कढईत तेल गरम करायला ठेवावे. चिकनचे तुकडे मिश्रणात बुडवून बदामीसर रंगावर तळून घ्यावेत. गरम गरमच खायला द्यावे. अंडे घातले नाही तरी चालते.

हे पण वाचा,

मटण पाया सूप रेसिपी | Paya Soup Recipe In Marathi

चवदार तंदुरी चिकन रेसिपी | Tandoori Chicken Recipe In Marathi

recipe of chicken fry । Chicken Fry Recipe In Marathi 

चिकन फ्राय प्रकार २ 

चिकन फ्राय रेसिपीसाठी साहित्य

अर्धा किलो चिकन

१०-१२ पाकळ्या लसूण

आल्याचा मोठा तुकडा

४-५ हिरव्या मिरच्या

१ लिंबू, मीठ

तेल, १ वाटी मैदा

१ वाटी दूध

१ अंडे

१ मोठा चमचा लोणी

मसाला अर्धा चमचा गरम मसाला, १/४ चमचा मिरपूड, अर्धा चमचा हळद.

चिकन फ्राय कृती 

Step 1

चिकनचे मोठे तुकडे करून धुऊन घ्यावेत. मीठ, हळद, लिंबू लावून ठेवावे. लसूण, आले, मिरच्या वाटून घ्याव्यात. 

Step 2

हे वाटण चिकनला लावावे. चिकन जाड बुडाच्या पातेल्यात ठेवून पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यावे. 

Step 3

नंतर पातेले उतरवून घावे. दूध, मैदा, मीठ, लोणी, अंडे एकत्र करून फेसून घ्यावे. त्यात मिरपूड व गरम मसाला घालून एकत्र करून घ्यावे. 

Step 4

चिकनचे शिजवलेले तुकडे या मिश्रणात बुडवून तेलात बदामीसर होईपर्यंत तळून घ्यावेत.

हे पण वाचा,

मटण बिर्याणी रेसिपी | Mutton Biryani Recipe In Marathi

चिकन चिली | Chicken Chilli Recipe In Marathi

Chicken Fry Recipe In Marathi । chicken fry recipe indian

चिकन फ्राय प्रकार ३

चिकन फ्राय रेसिपीसाठी साहित्य

पाऊण किलो चिकनचे ८ तुकडे

८ लसूण पाकळ्या

आल्याचा लहान तुकडा

मीठ, एक वाटी दही वाटण्यासाठी

मसाला १ चमचा लाल तिखट, १ चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद.

चिकन फ्राय कृती

Step 1

एका पातेल्यात चार ग्लास पाणी टाकावे. ८ पाकळ्या लसूण व आले थोडे ठेचून तेही पाण्यात टाकावे. मीठ टाकावे. पाणी उकळायला ठेवावे. 

Step 2 

नंतर त्यात चिकनचे तुकडे धुऊन ते टाकावेत. दोन-तीन मिनिटे चिकनचे तुकडे उकळू द्यावेत. 

Step 3

नंतर पातेले उतरून ठेवावे. पाच मिनिटे ते तसेच ठेवावे. चिकनचे पाणी काढून टाकावे.

Step 4

८-१० लसूण पाकळ्या, आले वाटून घ्यावे. त्यात गरम मसाला, तिखट, दही, थोडे मीठ, हळद घालून एकत्र करावे. हे मिश्रण चिकनच्या तुकड्यांना चोळून ठेवावे. 

Step 5

चिकन तसेच चार तास मुरू द्यावे. नंतर ओव्हनमध्ये (Oven) तुकडे बेक करावे, किंवा तेलात तळून घ्यावेत.

हे पण वाचा,

Chicken Roast Recipe Marathi | चिकन रोस्ट रेसिपी 

चिकन मसाला | Chicken Masala Recipe in Marathi 

चिकन टिक्का | Chicken Tikka Recipe in Marathi 

Chicken Fry Recipe In Marathi । Chicken Fry । chicken fry recipes

चिकन फ्राय प्रकार ४

चिकन फ्राय रेसिपीसाठी साहित्य

चिकन लेग्ज ८

मीठ अंदाजे

मीरपूड १ चमचा

तिळाचे तेल १ चमचा

१ मोठा कांदा

१ इंच आले

१ जुडी लसूण

ब्रँडी १ चमचा

तळण्यासाठी तेल

चिकन फ्राय कृती

Step 1

पहिल्यांदा चिकनचे तुकडे स्वच्छ धुवून घावे. त्याला मीठ, तिळाचे तेल, ब्रँडी, मिरपूड, कांदा, आले यांचा काढलेला रस हे सर्व लावून ४-५ तास ठेवणे. 

Step 2

तेल टाकून पहिल्यांदा मंद तेलावर तुकडे तळून काढावे. कॉकलेटबरोबर सॅलड म्हणून खायला देण्यासाठी हे छान लागते.

Chicken Fry Nutrition 👨‍⚕️

Calories: 204kcal | Carbohydrates: 6g | Protein: 11g | Fat: 12g | Saturated Fat: 2g | Cholesterol: 45mg | Sodium: 87mg | Potassium: 128mg | Vitamin A: 170IU | Vitamin C: 19.1mg | Calcium: 20mg | Iron: 0.6mg

निष्कर्ष चिकन फ्राय रेसिपी मराठी  

आता आपण पाहिले आहे Chicken Fry Recipe In Marathi (चिकन फ्राय रेसिपी). आपण बनवायला शिकलो चिकन फ्राय. आम्ही आशा करतो कि तुम्हला हि रेसिपी खूप आवडली असेल. आपणास ही रेसिपी आवडली असल्यास, Comment करण्यास आणि Share करण्यास विसरू नका. मुख्यपृष्ठास भेट द्या.


रेसिपी Share करा 👇

2 thoughts on “Chicken Fry Recipe In Marathi | चिकन फ्राय रेसिपी मराठी

Leave a Reply

Your email address will not be published.