चिकन मसाला | Chicken Masala Recipe in Marathi | 5 पद्धतीने बनवा

रेसिपी Share करा 👇

नमस्कार, Chicken masala recipe in marathi, चिकन मसाला म्हणलं कि लगेच तोंडाला पाणी सुटत. चिकन मसाला बनवायच्या खूप पद्धती आहेत. येथे आपण पाच प्रकारे चिकन मसाला रेसिपी बनवणार आहोत. तुम्हला कोणती पद्धत बरी वाटते त्यानुसार बनवा. साहित्य कोणते लागते? कृती कशी करायची? हे सर्व खाली वेवस्तीत दिले आहे.  

Chicken Masala Recipe in Marathi 

चिकन मसाला | Chicken Masala Recipe in Marathi | 5 पद्धतीने बनवा
चिकन मसाला

पद्धत पहिली चिकन मसाला बनवण्याची

साहित्य कोणते हवे? 

पाऊण किलो चिकन घावे, आल्याचा मोठा तुकडा, १५-१६ लसृण पाकळ्या, १ लिंबू, ४ कादे, पाव वाटी किसलेले खोबरे घावे, एक वाटी खवलेला नारळ, चार माठे चमचे तूप

मसाला – २ चमचे लाल तिखट, १ चमचा हळद, २ चमचे धने, १ चमचा बडीशेप, १ चमचा जिरे, १ चमचा खसखस, ३ मसाल्याचे वेलदोडे, ३-४ दालचिनीचे तुकडे, ८-१० काळी मिरी, जायफळाचा लहान तुकडा घावा. 

चिकन स्वच्छ करताना लक्षात ठेवण्याच्या बाबी… 

दुकानातून चिकन आणल्यावर त्यावर स्किन असेल तर ते काढावे. पातळ पापुद्रा असेल तर तो काढावा.  चिकनचे आवश्यकतेप्रमाणे लहान-मोठ्या किंवा मध्यम आकाराचे तुकडे करावे. स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळा धुऊन घ्यावे.  

कृती कशी करावी?/ Chicken Masala Recipe in Marathi

चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करून धुऊन घ्यावेत.आले-लसूण वाटून घ्यावे. तुकड्यांना मीठ, हळद, आले-लसणाचे वाटण लिंबू लावून ठेवावे. कांदे बारीक चिरून घ्यावेत. सुके खोबरे कोरडे भाजून घ्यावे. एक चमचा तूप कढईत घ्यावे. त्यात बडीशेप, जिरे, खसखस, वेलदोडे मिरे, जायफळ तुपावर भाजून घ्यावे. कांदे लालसर परतून घ्यावेत. सर्व मसाला, कांदे, भाजलेले खोबरे वाटून घ्यावे. खवलेला नारळ कच्चाच वाटून घ्यावा.

जाड बुडाच्या पातेल्यात तूप टाकावे. त्यात चिकन टाकावे मंदाग्नीवर परतून घ्यावे. चिकनचे अंगचे पाणी आटले, की त्यात वाटलेला मसाला व वाटलेला ओला नारळ परतून घ्यावा. लाल तिखट घालावे. त्यात तीन चार वाट्या गरम पाणी टाकावे. चिकनवर झाकण ठेवावे. चिकन शिजले, की पातेले उतरून ठेवावे.

चिकन मसाला पद्धत दुसरी 

साहित्य 

अर्धा किलो चिकन, २ कादे, ३-४ टोमॅटो, १०-१२ लसूण पाकळ्या, आल्याचा एक मोठा तुकडा, मीठ, अर्धे लिंबू, ३ मोठे चमचे तेल, पाव वाटी चिरलेली कोथिंबीर घावी. 

मसाला – ५-६ लवंगा, ३-४ दालचिनीचे तुकडे, १ चमचा जिरे, १ चमचा हळद, ७-८ लाल मिरच्या

दुसऱ्या पद्धतीची कृती 

चिकनचे मोठे मोठे तुकडे करून धुऊन घ्यावेत. मीठ, हळद, लिंबू लावून ठेवावे. सर्व मसाला, आले, लसूण वाटून घ्यावे. हे वाटण चिकनच्या तुकड्यांना लावून ठेवावे.

कांदा वाटून घ्यावा. जाड बुडाच्या पातेल्यात तेल टाकावे. ते गरम झाल्यावर कांदा परतून घ्यावा. कांदा गुलाबीसर झाल्यावर चिकनचे तुकडे परतण्यासाठी टाकावेत. एका वेगळ्या पातेल्यात एक पेलाभर पाणी उकळून घ्यावे. पातेले उतरून त्या पाण्यात अख्खे टोमॅटो घालावेत. त्यावर झाकण ठेवावे दोन-तीन मिनिटांनी टोमॅटोची साले काढावीत टोमॅटो कुस्करून घ्यावेत. 

चिकन थोडे परतून झाले, की त्यात टोमॅटो टाकावेत व चांगले शिजू द्यावे. रस्सा घट्ट झाला, की उतरून ठेवावे. वाढताना वरून कोथिंबीर वाढावी. चिकन मसाला पोळी, पुरी किंवा ब्रेडबरोबर खायला द्यावा.

पद्धत तिसरी चिकन मसाला बनवण्याची

साहित्य 

अर्धा किलो चिकन, ४ मोठे चमचे दही, १ कांदा, १ चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, मीठ, अर्धा चमचा हळद, तीन मोठे चमचे तेल घावे. 

मसाला (वाटण्यासाठी) – २ कांदे, १०- १२ लसूण पाकळ्या, आल्याचा मोठा तुकडा, अर्धी वाटी खवलेला नारळ, २ चमचे धणे पूड, १ चमचे जिरे, ३ वेलदोडे, ५ काळे मिरे, ३ लवंगा, १ चमचा शहाजिरे, ३ तुकडे दालचिनी, ४-५ लाल काश्मिरी मिरच्या, पाव वाटी चिरलेली कोथिंवीर घावी. 

कृती 

चिकन धुऊन त्याचे तुकडे करून चिकनला दही, मीठ, गरम मसाला, हळद व तिखट लावून ठेवावे. एक कादा बारीक चिरून लालसर परतून घ्यावा. हा कांदाही चिकनला लावून ठेवावा. ह्या चिकनला कुकरमध्ये एक शिट्टी द्यावी.

वाटण्यासाठी जो मसाला सांगितला आहे तो सर्व एकत्र बारीक वाटून घ्यावा. जाड बुडाच्या पातेल्यात तेल टाकावे. तेल गरम झाले, की वाटलेला मसाला टाकून तो चांगला परंतून घ्यावा. मसाल्याचा वास सुटला, की त्यात शिजवलेले चिकन घालावे. चांगले हलवावे. वास सुटला, तेल सुटले, की पातेले खाली उतरून ठेवावे. हा चिकन मसाला पुरी किंवा गरम गरम परोठ्याबरोबर चांगला लागतो.

चिकन मसाला चौथी पद्धत

साहित्य

अर्धा किलो चिकन, अर्धा किलो कांदे, ५-६ हिरव्या मिरच्या, आल्याचा मोठा तुकडा, १०-१२ लसूण पाकळ्या, मीट, ३ मोठे चमचे तेल, १५-१६ काजू.

मसाला – १०-१२ काळे मिरे, ६ मसाल्याचे वेलदोडे, ३-४ पाने तमालपत्र, १ चमचा धणे पूड, अर्धा चमचा जिरे पूड, दोन मोठे चमचे खसखस, अर्धा चमचा हळद घावी. 

चौथ्या पद्धतीची कृती 

चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करून धुऊन मीठ, हळद लावून ठेवावेत. काजू भिजत घालावेत. वाटीभर पाण्यात खसखस घालून तीन-चार मिनिटे उकळून घ्यावी. खसखस गार झाली, की खसखस व काजू बारीक वाटून घ्यावेत. आले, लसूण, मिरच्या वाटून घ्याव्यात. कांदे खूप बारीक चिरून घ्यावेत. 

जाड बुडाच्या पातेल्यात तेल टाकावे. कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यावा. कांदा लाल झाला, की त्यात चिकनचे तुकडे व तीन वाट्या गरम पाणी घालावे. चिकन शिजले, की त्यात वाटलेले आले, लसूण व मिरच्या टाकून हलवावे. नंतर त्यात अख्खी दालचिनी, लवंग, मिरी, वेलदोडे, तमालपत्र टाकावे व हलवत राहावे. खमंग वास सुटल्यावर काजू व खसखशीचे वाटण, धणे, जिरेपूड घालून हलवावे. तेल सुटले, की पातेले उतरून ठेवावे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.

उकडलेली तीन अंडी घ्यावीत. त्याचे गोल काप वरून ठेवावेत. हा चिकन मसालाही पूरी किंवा परोठ्याबरोबर फारच चवदार लागतो.

पाचवी पद्धत चिकन मसाला बनवण्याची/ Chicken masala recipe in marathi 

साहित्य 

पाऊण किलो चिकन, एक वाटी दही, ४ मोठे चमचे तेल चिकनला लावण्यासाठी, १ चमचा तिखट,१ चमचा गरम मसाला, मीठ, १ तळलेला कांदा, अर्धा चमचा हळद.

वाटण्यासाठी मसाला – ३ कांदे, २ लसूण जुड्या, आल्याचे २-३ मोठे तुकडे, अर्धी वाटी किसलेले खोबरे, ४ चमचे धणे, १ चमचा जिरे, ५ वेलदोडे, १०-१२ काळी मिरी, ६ लवंगा, अर्धा चमचा शहाजिरे, ४-५ तुकडे दालचिनी, १ चमचा बडीशेप, ७-८ लाल काश्मिरी मिरच्या घावी. 

कृती 

चिकन तुकडे करून धुऊन घ्यावे मीठ, हळद दही लावावे. एक मोठा चमचा तेल पातेल्यात घालून बारीक चिरलेला एक कांदा परतून घ्यावा. हा कांदा लालसर परतला, की त्यात १ चमचा तिखट घालून परतून घ्यावे. हा परतलेला कांदा चिकनला लावून ठेवावा. हे मिश्रण अर्धा तास तसेच ठेवावे.

वाटण्यासाठी जो मसाला दिला आहे त्यातील सुका मसाला आधी वाटावा. नंतर त्यात बाकी मसाला घालून बारीक वाटून घ्यावा. जाड बुडाच्या पातेल्यात मसाला लावलेले चिकन घालावे. ते मध्यम आचेवर चांगले परतून घ्यावे. साधारण सात-आठ मिनिटे परतून झाल्यावर त्यात वाटलेला मसाला घालावा. चागला वास सुटेपर्यंत परतावे. वाटलेला मसाला घातला, की गॅस आणखी कमी करावा. साधारणपणे दहा मिनिटात चिकन चांगले शिजते. चिकन शिजले, की पातेले उतरवावे. या प्रकारात पाणी घालून शिजवू नये.

Chicken Roast Recipe Marathi| चिकन रोस्ट रेसिपी बनवायला शिकणार आहोत

चिकन टिक्का | Chicken Tikka Recipe in Marathi – Marathi Recipe

Conclusion 

आत्ता आपण पाहिलं कि चिकन मसाला रेसिपी, Chicken masala recipe in marathi, कशी बनवायची. यामध्ये आपण पाच पद्धतीने बनवायला शिकलो. वरती तुम्ही वाचलात असालच, त्या प्रमाणे तुम्हाला कोणती पद्धत आवडते त्यानुसार तयार करू शकता चिकन मसाला. या सर्व रेसिपी आवडल्या असेल तर Comment आणि Share करायला विसरू नका. 


रेसिपी Share करा 👇

12 thoughts on “चिकन मसाला | Chicken Masala Recipe in Marathi | 5 पद्धतीने बनवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *