Dhirde Recipe In Marathi | धिरडे रेसिपी
धिरडे किंवा डोसे हा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. DHIRDE RECIPE IN MARATHI या बद्दल माहिती घेऊ. घावन, धिरडे, डोसा, आंबोळी, पॅनकेक ही सर्व भावंडेच आहेत. करावयास सोपी असूनही, सर्वांकडे नेहमीच करतात, असे नाही.
तिखट धिरड्यांबरोबर दुसरे काहीही तोंडीलावणे लागत नाही. मधल्या वेळी करावयास अथवा आयत्या वेळी कोणी पाहुणे जेवायला थांबणार असल्यास, धिरड्यासारखा सोपा पदार्थ नाही.

पुष्कळांकडे फक्त तांदुळाच्या पिठाची किंवा डाळीच्या पिठाची Dhirde करतात. पण वेगवेगळ्या प्रकारची अनेक तऱ्हेची धिरडे, डोसे, पॅनकेक्स इत्यादींची पाककृती इथे देत आहे, अवश्य करून पाहा.
धिरड्यांसाठी पीठ भिजवताना प्रथम पिठाइतकेच पाणी घालावे. मग पीठ कालवून जरुरीप्रमाणे थोडेसे पाणी घालावे. धिरडे घालण्यासाठी काहील किंवा पुरणपोळीचा सपाट तवा वापरावा. म्हणजे धिरडे पातळ घालता येते. त्याला आच चांगली लागते व त्यामुळे ते छान जाळीदार व कुरकुरीत होते.
धिरडे घालण्यापूर्वी, तवा नेहमी चिंच व मीठ लावून स्वच्छ घासून घ्यावा. म्हणजे धिरडे बिघडत नाही. धिरडे तव्यावर घालण्यापूर्वी सर्व पीठ खालपासून ढवळून घ्यावे. पीठ तव्यावर घालण्यासाठी कप वापरावा.
DHIRDE RECIPE IN MARATHI (धिरडे रेसिपी)
प्रकार १
धिरडे रेसिपीसाठी साहित्य
साधारण दोन भांडी तांदूळ
अर्धे भांडे उडीद डाळ
अर्धे भांडे तूर डाळ
अर्ध भांडे मूग डाळ
तांदूळ धुऊन कोरडे वाळवावेत
नंतर त्यात वरील ..
डाळी, एक चमचा मेथ्या, एक चमचा जिरे असे घालून गिरणीतून एकदम दळून आणावे.
धिरडे रेसिपी कृती?
dhirde recipe in marathi | tandalache dhirde recipe in marathi
Step 1
वरीलप्रमाणे दळून आणलेले पीठ तीन वाट्या घ्यावे. त्यामध्ये मीठ, तिखट चवीप्रमाणे साधारण एक एक चमचा घालावे.
Step 2
हळद अर्धा चमचा, बारीक चिरून कोथिंबीर घालावी. तापलेल्या तव्यावर एक चमचा तेल सोडावे.
Step 3
एक डाव पीठ घालावे. अलगद डावाने पसरवावे. पीठ घालताना गॅस मंद करावा. म्हणजे पीठ उलटून येत नाही. सरावाने पीठ हाताने पातळ पसरवता येऊ लागते.
Step 4
बदामी रंगासारखे धिरडे झाले की वरून चमचाभर तेल सोडून उलटावे गरम गरम खावयास द्यावे.
प्रकार २
धिरडे रेसिपीसाठी साहित्य
आयत्या वेळी पोळी, भाकरी कमी पडल्यास धिरडी करावयाची असल्यास नुसत्या कणकेत डाळीचे पीठ अगर तांदळाचे पीठ घालून किंवा कणिक, डाळीचे पीठ, ज्वारीचे पीठ एकत्र करूनही करता येतात.
नुसत्या तांदूळ व डाळीच्या पिठाचीही चांगली होतात.
धिरडे रेसिपी कृती?
dhirde recipe | kanik dhirde recipe | dhirde recipe in marathi
Step 1
साधारण कोणत्याही दोन वाटी पिठात,
चमचाभर मीठ, हळद, तिखट, एक चमचा ओवा, बारीक चिरून कोथिंबीर व एक चमचा तेल घालून पीठ डावाने घालण्याइतपत थोडेसे ताक व पाणी घालून सैल भिजवावे.
(ताक नाही घातले तरी चालते).
Step 2
तापलेल्या तव्याला एक चमचा तेल लावावे. त्यावर डावभर पीठ ओतावे.
Step 3
पीठ डावाने किंवा हाताने पसरवावे. फार पातळ धिरडे करू नये. मोडण्याची भीती असते.
Step 4
धिरडे खालून बदामी रंगासारखे झाल्यावर कडेने तेल सोडून उलटताना चुरचुरीत झाले की खावयास द्यावे.
धिरडे रेसिपी टीप
प्रथम Dhirde करण्यासाठी तव्याला थोडे तेल लावून घ्यावे. अग्री प्रखर असावा. कांदा अर्धा कापून, जेवायच्या काट्याला टोचून त्याने तव्याला तेल लावावे.
म्हणजे तेल चांगले लावले जाते. तेल कमी पुरते. तव्यावर पीठ ओतताना, गोलाकार हात फिरवत ओतावे.
लगेच गार पाण्यात हात बुडवून, धिरडे हाताने पातळ सारवावे. जर जाडसर धिरडे आवडत असेल, तर झाकण ठेवावे.
एरवी झाकण ठेवण्याची जरुरी नाही. चुरे असा आवाज आला, की धिरडे उलटवावे.
खालच्या बाजूने जरा लालसर झाले, की उतरवून गरमच वाढावे. गॅसच्या किंवा स्टोव्हच्या ज्वाळेपेक्षा फार मोठी धिरडेघालू नयेत.
अशी धिरडे कडेला शिजत नाहीत व मध्यभागी करपतात.
ज्या धिरड्यात अंडे घालावयाचे असते, ते पीठ अर्धा तास तरी अगोदर भिजवून ठेवावे.
अंडी खाणान्यांनी पिठात एखादे अंडे फोडून घालावे. कुठल्याही पिठाची डाळी भिजवून व वाढून, त्यात तांदुळाचे पीठ मिसळून रव्या मैद्याची, गोडाची, तिखटावी अशी अनेक प्रकारची धिरडे करता येतात.
हे पण वाचा,
Tomato Omelette Recipe In Marathi | टोमॅटो ऑम्लेट रेसिपी
छोले भटुरे | Chole Bhature Recipe In Marathi
बाकरवडी रेसिपी | Bhakarwadi Recipe In Marathi
Idli Sambar Recipe In Marathi | इडली सांबार
DHIRDE RECIPE IN MARATHI (धिरडे रेसिपी)
In English
Methode 1
Ingredients For Dhirde Recipe
About two pots of rice
Half a pot of urad dal
Half a pot of tur dal
Half a pot of green dal
Wash and dry the rice
Then in it ..
Add pulses, one teaspoon of fenugreek, one teaspoon of cumin seeds and grind it in a mill.
How To Make Dhirde
Step 1
Take three bowls of flour as above. Add one teaspoon of salt and red chilli powder to taste.
Step 2
Add half a teaspoon of turmeric powder, finely chopped cilantro. Pour a tablespoon of oil on the heated tawa.
Step 3
Add a handful of flour. Spread evenly. While adding flour, reduce the heat.
That is, the flour does not come back.
Step 4
With practice, the flour can be spread thin by hand.
Step 5
When it turns brown, leave a spoonful of oil on top and turn it over. Make it this way dhirde recipe in marathi.
Methode 2
How To Make Dhirde

dhirde recipe in marathi | tandalache dhirde recipe in marathi
In any two cups of flour, add a teaspoon of salt, turmeric powder, red chilli powder, one teaspoon of ova, finely chopped cilantro and one teaspoon of oil, add buttermilk and water and soak.
(Runs even if no buttermilk is added).
Step 1
Add a teaspoon of oil to the heated tawa. Pour flour on it.
Step 2
Spread the flour left or by hand. Don’t do too thin. There is a fear of breaking.
Step 3
When it becomes brown in color, leave the oil on the side and let it eat when it turns crispy.
हे पण वाचा,
5 Very Easy To Make Healthy Breakfast Indian Recipes 2021
Marathi Recipes Kothimbir Vadi | कोथिंबीर वडी रेसिपी
भेळ पुरी पटकन बनवा | Bhel Puri Recipe In Marathi
पाणीपुरीचे पाणी । Pani Puri Che Pani Recipe In Marathi
रगडा पॅटिस बनवायला शिकू | Ragda Pattice Recipe Marathi
Conclusion For Dhirde Recipe In Marathi
Now we have seen How To Dhirde Recipe (धिरडे रेसिपी). We learned to make (Dhirde Recipe In Marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share. Visit Home Page.
Wow superr!!
Pingback: Tomato Omelette Recipe In Marathi • टोमॅटो ऑम्लेट रेसिपी 2 मिनिटांत
Pingback: Samosa Recipe In Marathi • समोसा रेसिपी पटापट बनवा - Marathi Recipe
Pingback: Dosa Recipe In Marathi • हॉटेल सारखा डोसा रेसिपी बनवा - Marathi Recipe
Pingback: Shev Recipe In Marathi • शेव रेसिपी सोप्या पद्धतीने बनवा - Marathi Recipe
Pingback: Chakwat Bhaji Recipe In Marathi • चाकवत भाजी आंबट-तिखट रेसिपी