Gul Poli Recipe In Marathi | गुळ पोळी
गुळ पोळी ‘मकर संक्रांती’ च्या दिवशी बनवली जाते. हा सण साजरा करण्यासाठी महाराष्ट्रीय लोक पारंपारिक ‘गुळ पोळी’ तिळगुळ लाडू तयार करतात. Gul poli recipe in marathi, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी उत्तम आहे.

मुख्य घटक म्हणजे गुळ आणि तीळ हे शरीर उबदार ठेवण्यास मदत करतात. थंडी मध्ये हिवाळ्यात आवश्यक पोषण पुरवतात. खमंग व खुसखुशीत गुळाची पोळी आपण खाली step by step करायला शिकूया.
Gul Poli Recipe In Marathi (गुळाची पोळी)
गुळ पोळीसाठी साहित्य
अर्धा किलो पिवळा गुळ (चिकीचा घेऊ नये)
तिळाची किंवा खसखशीची पूड अर्धी वाटी
१ वाटी डाळीचे पीठ
१०-१२ वेलदोडे
पीठ भाजण्यासाठी अर्धी वाटी तेल
६ वाट्या कणिक
अर्धी वाटी डाळीचे पीठ
पाव वाटी कडकडीत तेलाचे मोहन
पाव चमचा मीठ
साधारण १ वाटी तांदळाची पिठी पोळी लाटण्यासाठी
गुळाच्या पोळीची कृती
gul poli recipe in marathi खाली step by step करायला शिकू,
Step 1
गुळ किसणीवर किसून घ्यावा म्हणजे त्यात खडा राहत नाही. डाळीचे पीठ तेलावर चांगले बदामी रंगावर भाजून घ्यावे.
Step 2
तीळ किंवा खसखस लालसर भाजून गार करून बारीक कुटून घ्यावी. वेलदोड्याचे दाणे किंचित गरम करून पूड करावी म्हणजे बारीक होते.
Step 3
नंतर किसलेल्या गुळात भाजून गार केलेले डाळीचे पीठ, तिळाची पूड, वेलदोडा पूड घालून गुळ एकजीव करावा.
गुळाच्या पोळीचा तयार केलेला गुळ एक महिनाभर चांगला राहतो. (पावसाळ्यात सोडून एरव्ही) म्हणून शक्यतो गुळ आधी करून ठेवावा.
Step 4
पोळ्या करावयाच्या वेळेस कणिक चाळून घ्यावी. त्यात तेलाचे मोहन, डाळीचे पीठ, मीठ घालून कणिक घट्ट भिजवावी.
तेलाच्या हाताने मळून ठेवावी. कणकेचे मोठ्या लिंबाएवढे दोन गोळे घ्यावेत. एका गोळ्याएवढा गुळ घ्यावा.
Step 5
तिन्ही पाऱ्या छोट्या छोट्या लाटून घ्या. पहिल्या पारीवर गुळाची पारी. मग पुन्हा कणकेची ठेवा. किंचित कडा दाबून तादुळाच्या पिठीवर पातळ पोळी लाटा.
marathi recipe gul poli | gulachi poli recipe marathi mdhe
Step 6
पोळी लाटताना कडेपर्यंत गुळ पसरू द्या. पोळी चांगली खमंग भाजा. नाहीतर गार झाल्यावर मऊ पडेल. पोळी भाजताना तव्यावर चमच्याने थोडेसे तेल सोडण्यास हरकत नाही.
पोळी तव्यावर फुटल्यास एक छोटेसे फडके पाण्यात भिजवून तव्यावरून फिरवा. म्हणजे पुढच्या पोळीला डाग पडणार नाहीत. सराव झाल्यावर थोडे गुळाचे प्रमाण वाढवावे. पाळ्या पाच दिवस टिकतात.
हे पण वाचा,
सोपी पद्धत पूरण पोळी । Puran Poli Marathi Recipe
निष्कर्ष गुळ पोळी
आता आपण पाहिले आहे, Gul Poli Recipe In Marathi (गुळ पोळी). आपण बनवायला शिकलो Maharashtrian gulachi poli. आम्ही आशा करतो कि तुम्हाला हि रेसिपी खूप आवडली असेल. आपणास ही रेसिपी आवडली असल्यास, Comment करण्यास आणि Share करण्यास विसरू नका. Homepage भेट द्या.
Pingback: सोपी पद्धत पूरण पोळी • Puran Poli Marathi Recipe - Marathi Recipe
Pingback: खमंग व खुसखुशीत खव्याची पोळी • Khavyachi Poli - Marathi Recipe