Kairiche Lonche Recipe In Marathi | बनवायला शिका कैरीचे लोणचे – मराठी रेसिपी

रेसिपी Share करा 👇

नमस्कार, बनवायला शिका Kairiche lonche recipe in marathi. या रेसिपी पोस्ट मध्ये कैरीचे लोणचे दोन प्रकारे तयार करणार आहोत. तुम्हाला कोणती पद्धत आवडते त्यानुसार करा. चला पाहू कैरीचे लोणचे. 

Kairiche Lonche Recipe in Marathi 

कैरीचे लोणचे | Kairiche Lonche Recipe in Marathi - मराठी रेसिपी

साहित्य 

दोन किलो काळ्या पाठीच्या घट्ट कैऱ्या घावे, एक वाटी मोहरीच्या डाळीचे कूट, एक वाटी लाल तिखट, दोन वाट्या मीठ, चार चमचे मेथ्या, हिंग पूड चांगल्या वासाची दोन चमचे, दीड वाटी गोडे तेल.

कृती

प्रथम कैऱ्या भरपूर पाण्यात बुडवून स्वच्छ धुऊन कोरड्या फडक्याने पुसाव्यात. नंतर त्याच्या फोडी कराव्यात व त्याला थोडीशी (पाव चमचा) हळद व चार चमचे मीठ लावून दडपून ठेवाव्यात. नंतर दोन तासाने फोडीला पाणी सुटते. ते काढून टाकावे. म्हणजे फोड मऊ पडण्याची शक्यता कमी. नंतर थोड्याशा तेलात मेथ्या तळून घ्याव्यात. त्याची बारीक पूड करावी. 

निम्मा हिंग तळून घ्यावा आता कैरीच्या फोडी, मेथ्यापूड, काढून ठेवलेला हिंग, तळलेला हिंग, मोहरीच्या डाळीचे कूट (आवडत असल्यास मोहरीची डाळ बारीक न करता तशीच घेतली तरी चालते) तिखट, एक वाटी मीठ असे सर्व एकत्र कालवावे. बरणी स्वच्छ धुऊन अगदी कोरडी करावी. तळाला अर्धी वाटी मीठ पसरावे. त्यावर कालवलेले लोणचे घालावे. वरून गार केलेली तेलाची फोडणी ओतावी. व परत अर्धी वाटी मीठ पसरावे. 

लिंबू लोणचे । Limbu Lonche Recipe in Marathi

बरणीचे तोंड स्वच्छ पुसून झाकण लावावे. व वरून फडक्याने तोंड बांधावे. पहिला महिना साधारण दोन-तीन दिवसांनी वरचेवर लोणचे हलवावे. चव घेऊन पाहावे म्हणजे लोणच्याची चव खारट न वाटल्यास लागेल तसे मोठा चमचा अगर जास्त मीठ घालून हलवावे. मीठ भरपूर असल्याने लोणचे खराब होण्याची भीती राहत नाही.

टीप (Kairiche lonche)

कैरीच्या फोडी करण्यापूर्वी तेलात मेथ्या व हिंग तळून घेऊन फोडणी करावी म्हणजे लोणचे कालवेपर्यंत फोडणी गार होते. व त्यासाठी थांबून राहावे लागत नाही. 

तेलाची फोडणी न घालता सुद्धा लोणचे वर्षभर टिकते. वेगळी चव लागते. घरी मसाला करणे जमत नसल्यास बाजारातील मसाला आणून फोडीत मिसळल्यास लोणचे वर्षभर छान राहते. 

कैरीचे लोणचे प्रकार 2

साहित्य 

कैरी अर्धा किलो, कैरीच्या फोडीच्या पाऊणपट चिरलेला गूळ, दीड चमचा तिखट, दोन मोठे चमचे मीठ, पाव वाटी मोहरीच्या डाळीचे कूट, अर्धा चमचा तळलेल्या मेथ्या (त्याची बारीक पूड करावी) पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, पाव वाटी फोडणीसाठी तेल.

कृती 

कैऱ्या पुसून साले काढावीत. त्याच्या बारीक फोडी कराव्यात. फोडी, तिखट, मीठ, मेथीपूड, मोहरी कूट, हळद, गूळ हिंग हे सर्व एकत्र कालवावे. बरणीत तळाला थोडे मीठ पसरून ओतावे. वरून त्यावर गार केलेली फोड घालावी. फोडणी घातली नाही तरी, लोणच्याची आंबट-गोड चव छान लागते. हे लोणचे आठ ते दहा दिवस छान राहते. समारंभ प्रसंगी आदल्या दिवशी करून ठेवण्यास सोपे आबटगोड चवीमुळे लहान-थोर सर्वच आवडीने खातात.

Conclusion 

आत्ता आपण पाहिलं कि कैरीचे लोणचे कसे बनवायचे. यामध्ये आपण 2 पद्धतीने कृती करून Kairiche lonche recipe in marathi मध्ये  बनवायला शिकलो. वरती तुम्ही वाचलात असालच. असच या वेबसाइटला भेट देतजा अशी विनंती. ही रेसिपी आवडली असेल तर Comment आणि Share करायला विसरू नका.


रेसिपी Share करा 👇

5 thoughts on “Kairiche Lonche Recipe In Marathi | बनवायला शिका कैरीचे लोणचे – मराठी रेसिपी

Leave a Reply

Your email address will not be published.