कांद्याच्या पातीची भाजी | Kandyachya Patichi Bhaji – Marathi Recipe

रेसिपी Share करा 👇

सोपी व लवकर होणारी कांद्याच्या पातीची भाजी सगळ्यांची आवडती असते. साहित्य कोणते लागते? कृती कशी करायची? से सर्व खाली दिले आहे. चला पाहू Kandyachya Patichi Bhaji

Kandyachya Patichi Bhaji (कांद्याच्या पातीची भाजी)

कांद्याच्या पातीची भाजी  Kandyachya Patichi Bhaji - Marathi Recipe

साहित्य 

कांद्याच्या पातीची १ जुडी, डाळीचे पीठ, तिखट, मीठ, चवीसाठी थोडी साखर, कोथिंबीर, ओले खोबरे. 

कांद्याच्या पातीची कृती? 

कांद्याची पात बारीक चिरून घ्यावी. नंतर पातीबरोबरचे कांडेही उभे चिरून घ्यावेत. नंतर भाजी स्वच्छ धुऊन चाळणीत निथळत ठेवावी. हिंग, मोहरी, हळद घालून जरा जास्त तेलाची फोडणी करावी. कांद्याची पात व कांदे घालून जरा परतावेत. मंदारीवर झाकण ठेवून भाजी शिजू द्यावी. पाणी अजिबात घालायचे नाही. भाजी धुतल्यावर जो ओलेपणा येतो, तेवढा भाजी शिजायला पुरतो. 

भाजी शिजली, की तिखट, मीठ व चवीसाठी थोडी साखर घालावी. नंतर वरून थोडे थोडे डाळीचे पीठ टाकून हलवावी. भाजी बेताची मोकळी होईल, इतके डाळीचे पीठ घालावे. भाजी सतत हलवत राहावे. खाली जळू देऊ नये.

टीप 

ही भाजी चवीला अतिशय उत्तम होते. अशीच मुळ्याच्या पाल्याची, फ्लॉवरच्या कोवळ्या पानांची, नवलकोलच्या पानांची किंवा कोथिविरीची भाजी करावी. पुष्कळांकडे डाळीच्या पिठात पाणी घालून ते पीठ शिजलेल्या भाजीवर ओततात. पण अशी केलेली भाजी पिठल्यासारखी लागते. पीठ पेरून केलेली भाजी जास्त रुचकर लागते.

KARLYACHI BHAJI IN MARATHI | कारल्याची भाजी बनवायला शिकूया

Literature

1 Judi of onion leaves, dal flour, red chilli powder, salt, a little sugar to taste, cilantro, wet coconut.

Action (Kandyachya Patichi Bhaji)

Finely chop the onion leaves. Then chop the onions along with the leaves. Then wash the vegetables and drain them. Add asafoetida, mustard seeds, turmeric powder, and stir well. Add onion leaves and onion and saute for a while. Cover the (mandari) and cook the vegetables. Do not add water at all. The moisture that comes after washing the vegetables is enough to cook the vegetables.

When the vegetables are cooked, add red chilli powder, salt, and a little sugar to taste. Then add dal flour and stir well. Add enough dal flour to loosen the vegetables. Stir the vegetables constantly. Don’t let it burn down.

Conclusion

Now have seen how to make Kandyachya Patichi Bhaji (कांद्याच्या पातीची भाजी). We learned to make ( kandyachya patichi bhaji in marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share.


रेसिपी Share करा 👇

One thought on “कांद्याच्या पातीची भाजी | Kandyachya Patichi Bhaji – Marathi Recipe

Leave a Reply

Your email address will not be published.