कटाची आमटी | Katachi Amti Recipe in Marathi – मराठी रेसिपी

रेसिपी Share करा 👇

नमस्कार, Katachi amti recipe in marathi आज आपण बनवायला शिकणार आहोत. ज्या वेळेस आपण पुरणपोळीला डाळ शिजवतो, तेव्हा शिजलेली डाळ चाळणीत निथळून जे पाणी राहते त्याला कट म्हणतात. त्यामुळे सर्वसाधारण ही आमटी पुरणपोळी करतो तेव्हाच केली जाते. तो कट जास्त दाट व भरपूर असतो.

एरवी पाव वाटी हरबरा डाळ जास्त पाणी घालून शिजवावी. डाळ पूर्ण शिजल्यानंतर चाळणीत ओतावी व खालचे पाणी म्हणजे कट.

कटाची आमटी  Katachi Amti Recipe in Marathi - मराठी रेसिपी

Katachi Amti Recipe in Marathi 

साहित्य 

कट साधारण चार वाटी असल्यास लियाएवढी चिंच, दुप्पट गूळ एक चमचा लाल तिखट, मीठ, एक चमचा काळा मसाला, एक चमचा जिरे, मोठा डाव सुके खोबरे, दोन पाने तमालपत्र, दालचिनीचे दोन बोटाच्या पेराएवढे तुकडे, असल्यास शेवग्याच्या शेंगा चवीपुरत्या, कढीलिंब, तेल, फोडणीचे साहित्य. 

Turichya Dalichi Amti | तुरीच्या डाळीची आमटी

Kadhi Recipe In Marathi | कढी रेसिपी

कृती 

प्रथम तेलाची मोहरी, हिंग, हळद, कढीलिंब घालून फोडणी करावी. त्यात दालचिनी, तमालपत्र घालावे. वास सुटल्यावर कट ओतावा. असल्यास शेवग्याच्या दोन शेंगा तुकडे करून धुऊन टाकाव्यात. 

शेंगा मऊ झाल्यावर त्यात कोळलेले चिचेचे पाणी, गूळ, तिखट, मीठ, काळा मसाला घालावा. जिरे, खोबरे भाजून कुटून घालावे. चांगली उकळू द्यावी. दाट वाटल्यास पाणी वाढवावे. पुरणपोळी करताना कट वाढल्यास गुळाऐवजी लिंबाएवढे पुरण घालावे.

मस्त हॉटेल सारखा सांबर बनवायला शिका | Sambar Recipe In Marathi

मटकीची उसळ बनवायला शिकू । Matki Chi Usal – मराठी रेसिपी

मसाले भात पटकन बनवा | Masale Bhat Recipe in Marathi – Marathi Recipe

साखर भात | Sakhar Bhat Recipe in Marathi | भात पुलाव – Marathi Recipe

Conclusion 

आत्ता आपण पाहिलं कि कटाची आमटी कशी बनवायची. यामध्ये आपण कृती करून पहिली. असच या वेबसाइटला भेट देतजा अशी विनंती. वरती तुम्ही वाचलात असालच. ही रेसिपी आवडल्या असेल तर Comment आणि Share करायला विसरू नका.


रेसिपी Share करा 👇

5 thoughts on “कटाची आमटी | Katachi Amti Recipe in Marathi – मराठी रेसिपी

Leave a Reply

Your email address will not be published.