खव्याची पोळी | Khavyachi Poli

रेसिपी Share करा 👇

खवा पोळी ही एक महाराष्ट्रीयन पारंपारिक रेसिपी आहे. ही Khavyachi Poli चवीसाठी उत्तम असते. तसेच खास प्रसंगी सणादिवशी बनवली जाते. यामध्ये खवा, रवा आणि मैदा वापरला जातो हे तुम्ही पण घरी करून पहा. 

खव्याची पोळी | Khavyachi Poli

Khava Poli (Khavyachi Poli)

खवा पोळीसाठी साहित्य 

पाव किलो खवा

२ वाट्या पिठी साखर

पाव वाटी खसखस

५-६ वेलदोडे

रवा व मैदा प्रत्येकी मध्यम वाटी

पाव वाटी तेल

चवीपुरते मीठ

तांदळाची पिढी

खव्याची पोळी कशी बनवायची 

खमंग व खुसखुशीत Khavyachi Poli Recipe आपण खाली step by step करायला शिकूया. 

Step 1

खवा चांगला तांबूस भाजून घ्यावा. खसखस भाजून कुटून घ्यावी. खवा गार झाल्यावर हाताने मळून घ्यावा. 

Step 2

नंतर त्यात कुटलेली खसखस, पिठी साखर, वेलदोड्याची पूड, एक चमचा तांदळाची पिठी घालून सर्व एकत्र मळून गोळा करून ठेवावा.

Step 3

रवा, मैदा, तेल, अर्धा चमचा मीठ घालून पुरीच्या कणकेसारखा घट्ट भिजवावा. भिजवलेला गोळा कुटून घेऊन मऊ करावा. 

Step 4

नंतर त्याच्या लिंबाएवढा गोळ्या कराव्यात. दोन गोळ्या घ्याव्यात. एका गोळीपेक्षा जास्त खव्याचा गोळा घ्यावा. 

Step 5

गुळाच्या पोळीप्रमाणे दोन गोळ्यांमध्ये खव्याचा गोळा ठेवून, कडा बंद करावे. पातळ पोळ्या लाटाव्यात चमचाभर रिफाईड तेल सोडून पोळी खुसखुशीत भाजावी. 

खावयास देताना साजूक तृप पोळीवर घालावे. 

हे पण वाचा,

गुळ पोळी

पूरण पोळी

निष्कर्ष खवा पोळी 

आता आपण पाहिले आहे, Khavyachi Poli (खव्याची पोळी). आपण बनवायला शिकलो khawa poli. आम्ही आशा करतो कि तुम्हाला हि रेसिपी खूप आवडली असेल. आपणास ही रेसिपी आवडली असल्यास, Comment करण्यास आणि Share करण्यास विसरू नका. Homepage भेट द्या.


रेसिपी Share करा 👇

One thought on “खव्याची पोळी | Khavyachi Poli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *