कोबीची भाजी 3 प्रकारे बनवा । Kobichi Bhaji – मराठी रेसिपी

रेसिपी Share करा 👇

नमस्कार, Kobichi bhaji बनवायला शिकणार आहोत. यामध्ये 3 पद्धतीने भाजी कशी बनवतात ते पाहू. कोणते साहित्य लागते? कृती कशी करायची? हे सर्व खाली दिले आहे. 

Kobichi Bhaji

कोबीची भाजी 3 प्रकारे बनवा । Kobichi Bhaji - मराठी रेसिपी

साहित्य

कोबी अर्धा किलो, सहा-सात हिरव्या मिरच्या, अगर एक मोठा चमचा लाल तिखट, एक चमचा मीठ, चवीला साखर, कोथिबीर.

कृती 

कोबी बारीक चिरावा नतर एक मोठा डाव तेलाची फोडणी करून त्यात स्वच्छ धुऊन चिरलेला कोबी टाकावा. फोडणीत मिरच्यांचे तुकडे टाकले नसतील तर लगेच तिखट मीठ, साखर घालून झाकण ठेवून शिजू द्यावे. या भाजीत पाणी घालू नये. तिखट मिठाला सुटलेल्या पाण्यावरच भाजी शिजते. ही भाजी कोरडी कोरडी छान लागते. ही भाजी शिजण्यास फार वेळ लागत नाही. 

तसेच ती नेहमी मंद गॅसवर शिजू द्यावी. नंतर वरून कोथिवीर टाकावी. चुकून- भाजी शिजताना पाणी टाकल्यास एक छोटा बटाटा पातळ काप करून घालावा. म्हणजे बटाटा पाणी शोषून घेईल. व ओलसर कोरडी अशी भाजी होईल.

बटाटा कोबी भाजी

साहित्य

कोबीच्या भाजीत बटाटा जास्त आवडत असल्यास अगर आयत्या वेळी कोबी पाव किलोच असेल तर त्यात दोन अगर तीन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून बारीक फोडी करून घालाव्यात.

कृती 

वरील भाजोच्या कृतीप्रमाणेच. तसेच वटाटाऐवजी हरवरां डाळ अर्धी वाटी भिजत घालून ती घातल्यासही चांगली होते. मात्र डाळ तासभर आधी भिजवावी.

प्रकार 3 Kobichi bhaji

साहित्य

कोबी पाव किलो, एक मोठा कांदा, पाव वाटी भिजत घालून अगर नुसती धुऊन मुगाची डाळ, लाल तिखट एक मध्यम चमचा, एक चमचा मीठ, चवीपुरती साखर, कोथिंबीर, एक मोठा डाव तेल.

कृती 

प्रथम मुगाची डाळ भिजत घालावी. कोबी व कांदा बारीक वेगवेगळा चिरावा. तेलाची हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात कांदा परतू्र घ्यावा. नंतर डाळ व बारीक चिरलेला कोबी स्वच्छ धुऊन टाकावा. लगेच तिखट, मीठ, साखर घालून चांगले हलवून पाण्याचा शिपका देऊन झाकणे ठेवाचे. मंद गॅसवर शिजू द्यावे. साधारण पाच ते सात मिनिटांत भाजी शिजते. नंतर वरून कोथिवीर, खोबरे घालावे. 

सुरणाची भाजी | Suranachi Bhaji Recipe in Marathi – Marathi Recipe

वांगी भाजी | Vangi Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe

बटाटा भाजी | Batata Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe

Conclusion 

आत्ता आपण पाहिलं कि कोबीची भाजी/Kobichi Bhaji कशी बनवायची. यामध्ये आपण 3 पद्धतीने बनवायला शिकलो. वरती तुम्ही वाचलात असालच. असच या वेबसाइटला भेट देतजा अशी विनंती. ही रेसिपी आवडली असेल तर Comment आणि Share करायला विसरू नका.


रेसिपी Share करा 👇

One thought on “कोबीची भाजी 3 प्रकारे बनवा । Kobichi Bhaji – मराठी रेसिपी

Leave a Reply

Your email address will not be published.