कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा | Kolhapuri Tambda Pandhra Rassa
झणझणीत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा म्हणलं कि तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग Kolhapuri Tambda Pandhra Rassa बनवू आणि जेवणावर ताव मारू.
कोल्हापुरी तांबडा रस्सा पहिल्यांदा आपण करणार आहेत. नंतर पांढरा रस्सा बनवूया. Kolhapuri Mutton तसेच Maharashtrian Mutton Recipe भारतात प्रसिद्ध आहे.

Kolhapuri Tambda Pandhra Rassa (तांबडा पांढरा रस्सा) | Kolhapuri Tambda Pandhra Rassa Recipe In Marathi
कोल्हापुरी तांबडा रस्सा
साहित्य
मटण १ किलो
अर्धी वाटी सुके खोबरे
१ चमचा तीळ
४ -५ मोठे कांदे
२-३ कांदे बारीक चिरून घ्यावेत
धणे अर्धा चमचा
२-३ लवंगा
दालचिनी १-२ तुकडे
थोडी कोथिंबीर
मीठ, तेल
कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला
हळद, १ इंच आले
कोल्हापुरी तांबडा रस्सा बनवण्यासाठी कांदे पातळ उभे चिरून बदामी रंगावर तळून घ्यावेत. सुके खोबरे किसून, भाजून घ्यावेत.
धणे व तीळ, तसेच लवंग व दालचिनीदेखील भाजून घ्यावी. हे सर्व एकत्र करून त्याचे वाटण करून घ्यावे. थोडे पाणी टाकून चांगली पेस्ट बनवून घ्यावी.
एका पातेल्यात तेल घालून त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून थोडे परतावे. नंतर त्यावर हळद घालावी.
सर्व चांगले परतावे. नंतर त्यावर मटण घालून परतावे. चवीनुसार मीठ घालावे. पाणी घालून मटण चांगले शिजवून घ्यावे. मटणाचे सूप त्याच भांड्यात ठेवावे.
त्यामध्ये कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला घालावा, आपण जे वाटण तयार करून ठेवलेले आहे, त्यातील अर्धे वाटण घालावे.
थोडे पाणी घालून मंद आचेवर तांबडा रस्सा चांगला उकळून घावा.
हा तांबडा रस्सा पातळच हवा. तो गरमागरम रस्सा लिंबू पिळून खाण्यास छानच लागतो. आपण हा तांबडा रस्सा करताना जे मटणाचे काप काढून ठेवलेले आहेत त्या मटणाचे आपल्याला सुके मटण करता येते.
कोल्हापुरी पांढरा रस्सा
साहित्य
अर्धा कप मटण
१ इंच आले
लसूण पेस्ट
मीठ चवीनुसार
दोन चमचे तूप
एक नारळाचे दूध
४ सुक्या लाल मिरच्या
दालचिनीचा एक तुकडा
१२ काळ्या मिऱ्या
४ लवंगा, खसखस ३ चमचे
सुके खोबरे किसलेले ३ चमचे
काजू दहा ते पंधरा
कोल्हापुरी पांढरा रस्सा बनवण्यासाठी काळी मिरी, दालचीनी व लवंग यांची एकत्र पावडर करून घेणे.
मटणामध्ये आले-लसूण पेस्ट व मीठ घालावे. पाणी अर्धा ते पाऊण पातेले घालावे. मटण चांगले शिजवून घ्यावे.
मटण शिजल्यावर त्यातील मटणाचे पीसं बाजूला काढून ठेवावेत. मटणाचे सूप मोठ्या पातेल्यात तसेच ठेवावेत.
किसलेले खोबरे, खसखस, काजू एकत्र अर्धा तास भिजत ठेवून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. एका पातेल्यामंध्ये २ चमचे तूप घालावे. त्यावर आले-लसूण पेस्ट घालावी.
सुक्या लाल मिरच्या घालाव्यात त्यावर लवंगा, दालचिनी, मिरची पावडर घालावी. त्यावर खोबरे, काजू, खसखसची पेस्ट घालून २ मिनटे परतून घ्यावे.
त्यावर मटणाचे सूप घालावे. चवीनुसार मीठ घालावे. चांगले उकळल्यावर त्यामध्ये नारळाचे दूध घालावे.
दूध घातल्यानंतर मंद आचेवर रस्सा ठेवावा व नंतर लगेच ७-८ मिनिटांनी गॅस बंद करावा. नारळाचे दूध घातल्यानंतर पांढरा रस्सा फार उकळवू नये.
बाजूला काढून ठेवलेल्या मटणाचे सुके मटण करावे. गरमागरम पांढरा रस्सा पिण्यास खूप टेस्टी व छान लागतो.
हे पण वाचा,
चिकन रोस्ट रेसिपी | Chicken Roast Recipe Marathi
मटण पाया सूप रेसिपी | Paya Soup Recipe In Marathi
चिकन चिली | Chicken Chilli Recipe In Marathi
चिकन मसाला | Chicken Masala Recipe in Marathi
चिकन टिक्का | Chicken Tikka Recipe in Marathi
मटण बिर्याणी रेसिपी | Mutton Biryani Recipe In Marathi
चवदार तंदुरी चिकन रेसिपी | Tandoori Chicken Recipe In Marathi
In English
Kolhapuri Tambda Pandhra Rassa Recipe | Kolhapuri Mutton Rassa
Kolhapuri Tambda Rassa
Literature
1 kg of meat
Half a cup of dried coconut
1 tablespoon sesame seeds
4-5 large onions
Finely chop 2-3 onions
Half a teaspoon of coriander
2-3 cloves
Cinnamon 1-2 pieces
A little cilantro
Salt, oil
Kolhapuri onion-garlic masala
Turmeric, 1 inch came
Make Kolhapuri Tambda Rassa
To make Kolhapuri Tambda Rassa, chop onions thinly and fry till brown. Grate and roast dry coconut.
Roast coriander and sesame seeds, as well as cloves and cinnamon.
Mix it all together. Add a little water and make a good paste.
In a bowl, add oil, finely chopped onion, and salt. Then add turmeric powder.
(सर्व चांगले परतावे)Then add mutton and fry. Add salt to taste. Add water and cook the mutton well. Put the mutton soup in the same pot.
Add Kolhapuri onion-garlic masala (Kolhapuri Mutton Masala powder) in it, (आपण जे वाटण तयार करून ठेवलेले आहे, त्यातील अर्धे वाटण घालावे)
Add a little water and bring to a boil over low heat. ThisTambda Rassa should be thin. It tastes good when squeezed lemon juice.
You can make dry mutton from the mutton slices that have been removed while making this Tambda Rassa
Kolhapuri Pandhra Rassa
Literature
Half a cup of mutton
1 inch came
Garlic paste
Salt to taste
Two tablespoons ghee
A coconut milk
4 dried red chillies
A piece of cinnamon
12 black peppers
4 cloves, poppy seeds 3 tbsp
3 tablespoons dried grated coconut
Cashews ten to fifteen
Make Kolhapuri Pandhra Rassa | Kolhapuri Tambda Pandhra Rassa
To make Kolhapuri Pandhra Rassa, mix black pepper, cinnamon and cloves together.
Add ginger-garlic paste and salt to the mutton. Add half to one pound of water. Cook the mutton well.
Once the mutton is cooked, set aside the mutton pieces. Place the mutton soup in a large bowl.
Soak grated coconut, poppy seeds and cashew nuts together for half an hour and make a fine paste. In a bowl, add 2 tbsp Ghee. Add ginger-garlic paste.
Add dried red chillies, cloves, cinnamon and chilli powder. Add coconut, cashew nuts, poppy seeds paste and saute for 2 minutes.
Add mutton soup. Add salt to taste. When it boils well, add coconut milk.
After adding milk, keep the gravy on low flame and immediately turn off the heat after 7-8 minutes.
The Pandhra Rassa should not boil too much after adding coconut milk.
Dry the mutton set aside. The hot Pandhra Rassa is very tasty and nice to drink. Mutton rassa is made in a hopeful way. indian mutton curry is very famous. Mutton recipes indian.
Conclusion For Kolhapuri Tambda Pandhra Rassa
Now we have seen How To Make Kolhapuri Tambda Pandhra Rassa (कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा). We learned to make (Kolhapuri Tambda rassa and Kolhapuri pandhra rassa). If you like this recipe, don’t forget to comment and share. Visit Home Page.
Pingback: मटण पाया सूप रेसिपी • Paya Soup Recipe In Marathi - Marathi Recipe
Pingback: Dosa Recipe In Marathi • हॉटेल सारखा डोसा रेसिपी बनवा - Marathi Recipe
Pingback: Shev Recipe In Marathi • शेव रेसिपी सोप्या पद्धतीने बनवा - Marathi Recipe
Pingback: Chakwat Bhaji Recipe In Marathi । चाकवत भाजी आंबट-तिखट रेसिपी
Pingback: Marathirecipe | Pearltrees
Pingback: Chicken Fry Recipe In Marathi • चिकन फ्राय रेसिपी मराठी (चिकन फ्राय ४ प्रकारे)