लिंबू लोणचे । Limbu Lonche Recipe in Marathi – Marathi Recipe
नमस्कार, Limbu lonche recipe in marathi, लिंबू लोणचे सगळ्यांना आवडते जेवण करताना. या पोस्ट आपण पाहणार आहोत आंबट, गोड, लिंबू लोणचे कसे बनवायचे. झटपट पद्धतीने हे लोणचे बनवायची रेसिपी आहे. यासाठी कोणते साहित्य लागते, बनवण्याची पद्धत कशी आहे आणि तुमच्यासाठी काही टीप आहे. चला पाहूया लिंबू लोणचे रेसिपी कशी बनवतात.
Limbu Lonche Recipe in Marathi

साहित्य
पंचवीस पातळ सालीची लिबे घ्यावे, दोन छोटे चमचे मेथ्या पाहिजे, एक चमचा हळद घ्यावी, दोन मोठे चमचे हिंग, एक मोठी वाटी मीठ, आणि पाव वाटी मोहरीची डाळ हे सर्व साहित्य असायला पाहिजे म्हणजे लिंबू लोणचे अगदी छान होईल.
लिंबू लोणचे कृती
प्रथम लिंबे स्वच्छ धुऊन अगदी कोरडी करावीत मोहरीची डाळ बारीक करून घ्यावी. थोड्याशा तेलात मेथ्या व हिंग (निम्मा) तळून घेऊन बारीक करावा नंतर उरलेला हिंग, हळद, मीठ वरील सर्व फोडीत कालवावेत. बरणी स्वच्छ पुसून तळाला दोन मोठे चमचे मीठ पसरावे व त्यात कालवलेल्या फोडी ओताव्यात. वरतीही झाकणापाशी दोन चमचे मीठ पसरून झाकण घट्ट लावावे.
प्रथम काही दिवस फडक्याने बांधून ठेवावे. आठ दिवस वैरणी उन्हात ठेवावी. तसेच दर दोन-चार दिवसांनी तळापासून लोणचे हलवून ठेवावे. मीठ कमी वाटल्यास वरून घालण्यास हरकत नाही. दीड वर्ष छान टिकते. जसजसे मुरेल तसे जास्त छान लागते याने आजारी माणसाच्या तोंडास चव येते. फार आंबट वाटल्यास अर्धी वाटी साखर लोणचे घालताना घातल्यास चालेल.
Limbu Lonche Recipe/ टीप
खाराच्या मिरच्या व लिंबाची लोणची साधारण दिवाळी झाल्यावर घालावीत. त्या वेळेस मिरच्या, लिंबे बरीच स्वस्त असतात तसेच ती या दिवसांत कोरडी असल्याने पदार्थ नासण्याची शक्यता खूपच कमी असते. तसेच लोणचे, अगर मिरचीस जर चुकून वरच्या भागावर बुरशी दिसली तर तो भाग वरचेवर काढून त्यात पुन्हा अर्धा वाटी मीठ घालून चांगले हलवून ठेवावे. व शक्यतो दोन महिन्यांत संपवावे म्हणजे सर्व पदार्थ टाकून देण्याची वेळ येत नाही.
या पण रेसिपी Try करा,
Kairiche Lonche Recipe In Marathi | बनवायला शिका कैरीचे लोणचे – मराठी रेसिपी
झटपट पुलाव | Pulav Recipe in Marathi | भात पुलाव – Marathi Recipe
सुरणाची भाजी | Suranachi Bhaji Recipe in Marathi – Marathi Recipe
वांगी भाजी | Vangi Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe
बटाटा भाजी | Batata Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe
Conclusion
आपण आत्ता पाहिलं कि लिंबू लोणचे कसे बनवायचे, Limbu lonche recipe in marathi. तुम्हाला ही Recipe आवडली असेल तर Comment करायला विसरू नका. आणि आमच्या वेबसाइट ला असच Visit करत जा.
Pingback: सुरणाची भाजी | Suranachi Bhaji Recipe in Marathi | – Marathi Recipe
Pingback: बटाटा भाजी | Batata Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या - Marathi Recipe
Pingback: Marathirecipe | Pearltrees
Pingback: कैरीचे लोणचे • Kairiche Lonche Recipe in Marathi - मराठी रेसिपी
Pingback: चिकन टिक्का | Chicken Tikka Recipe in Marathi - Marathi Recipe
Pingback: Annietur (annietur123) | Pearltrees