मटकी उसळ | Matki Usal Recipe In Marathi – उसळी

रेसिपी Share करा 👇

मटकी उसळ खूप सोप्या पद्धतीने बनवायला शिकणार आहोत. matki usal recipe in marathi साहित्य कोणते लागते? कृती कशी करायची? चला पाहू.

Matki Usal Recipe In Marathi (मटकी उसळ)

मटकी उसळ  Matki Usal Recipe In Marathi - उसळी

साहित्य 

मटकी पाव किलो, हिरव्या मिरच्या सात-आठ, आले, मीठ, छोट्या लिंबाएवढा गूळ, कच्चा मसाला दोन चमचे किंवा मोठा चमचा जिरे, एक डाव खोबरे कुटून, दोन डाव तेल, फोडणीचे साहित्य, कढीलिंब, आवडत असल्यास अर्धा वाटी भाजलेले किंवा साधे दाणे. 

मटकी उसळ कृती?

प्रथम मटकी (Matki) आदल्या दिवशी धुऊन भिजत घालावी. सायंकाळी ती फडक्यात बांधून चाळणीत ठेवावी. त्यावर घट्ट ताटली झाकावी. उन्हाळ्यात दुसऱ्या दिवशी मोड येतात. थंडीत थोडा जास्त वेळ लागतो. अशा वेळेस आदल्या दिवशी पहाटेच मटकी भिजत घालावी.

तेल तापवून त्यात मोहरी, थोडेसे जिरे, हिंग, कढीलिंबाची दहा-बारा पाने अशी फोडणी करावी. मिरच्यांचे तुकडे व अर्धा चमचा हळद घालावी. नंतर मटकी व दाणे घालावेत. रस कितपत हवा त्याप्रमाणे आधणाचे पाणी दोन ते चार वाट्या ओतावे. चांगली शिजल्यावर मीठ, गूळ, कच्चा मसाला, कोथिंबीर घालावी. वरून ओले खोबरे व कोथिबीर घालावी. त्याने उसळ छान लागते. मिरच्या नसल्यास लाल तिखट घालावे. आवडत असल्यास दोन चमचे काळा मसाला घालावा. किंवा एखादा कांदा चिरून व लसूण पाच-सहा पाकळ्या ठेचून घालावा. या उसळीत रस जास्त ठेवून तो ताक घालून सुद्धा छान लागतो.

मटकीचे कढण हवे असेल तर प्रथम मटकी (Matki) नुसती भरपूर पाणी घालून शिजवावी व त्याचे पाणी बाजूस काढावे. नंतर वरीलप्रमाणे फोडणी करून कोरडी उसळ केली तरी छान लागते.

या पद्धतीने मसूर, मूग, हुलगे(कुळीथ) यांची मोड आणून उसळ करावी किंवा आयत्या वेळी करावयाची असल्यास प्रथम कडधान्य धुऊन भाजून घ्यावे व नंतर वरील पद्धतीने उसळ करावी. मोड आलेल्याची चव वेगळी लागते.

Chakali Recipes In Marathi | चकली रेसिपीस

Shankarpali Recipe In Marathi | शंकरपाळी रेसिपी

KARLYACHI BHAJI IN MARATHI | कारल्याची भाजी बनवायला शिकूया

Literature (Matki Usal)

Matki Pav Kilo, seven to eight kg of green chilies, ginger, salt, jaggery, raw masala, two teaspoons or a tablespoon of cumin seeds, crushed coconut, oil, chopping ingredients, curry leaves, half a cup of roasted or plain seeds if you like.

Action

First wash and soak the pot the day before. In the evening, tie the matki in a cloth and keep it in a sieve. Cover with a thick plate. Modes come the next day in the summer. The cold takes a little longer. In this case, soak the pot early in the morning.

Heat oil and add mustard seeds, a little cumin seeds, asafoetida, ten to twelve curry leaves. Add chilli pieces and half a teaspoon of turmeric. Then add Matki and seeds. Pour two to four cups of Adhan water as much as you want. When well cooked, add salt, jaggery, raw masala, cilantro. Top with wet coconut and cilantro. The bounce looks great. If there is no chilli, add red chili powder. Add two teaspoons of black masala if you like. Or chop an onion and add five or six cloves of crushed garlic. It also tastes good with buttermilk.

Conclusion

Now have seen how to make matki usal recipe (मटकी उसळ). We learned to make (matki usal recipe in marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share


रेसिपी Share करा 👇

2 thoughts on “मटकी उसळ | Matki Usal Recipe In Marathi – उसळी

Leave a Reply

Your email address will not be published.