मेथीची भाजी 2 प्रकारे बनवा | Methichi Bhaji – मराठी रेसिपी

रेसिपी Share करा 👇

नमस्कार, Methichi Bhaji कशी बनवायची हे शिकणार आहोत. मेथीची भाजी बनवण्याचे दोन प्रकार पाहणार आहोत. तुम्हाला कोणती पद्धत आवडते त्यानुसार भाजी तयार करा. आणि भाजी कशी झाली आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. कोणते साहित्य लागते? कृती कशी करायची? हे सर्व खाली दिले आहे. चला पाहू मेथीची भाजी. 

Methichi Bhaji

मेथीची भाजी 2 प्रकारे बनवा | Methichi Bhaji - मराठी रेसिपी

प्रकार १

साहित्य: मेथीची भाजी दोन जुड्या, आठ-दहा मिरच्या, मीठ, डाळीचे पीठ, पाव वाटी तेल, फोडणीचे साहित्य.

कृती 

मेथी कोवळी पाहून आणावी. निवडून बारीक चिरावी. तेलाची फोडणी, मोहरी, हिंग, जिरे, हळद घालून करावी. लाल किंवा हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत. आवडत असल्यास लसणाच्या दहा-बारा पाकळ्या घालाव्यात. स्वच्छ धुऊन चिरलेली भाजी घालावी. पाण्याचा शिपका मारून झाकून शिजवावी. शिजल्यावर मीठ, मिरच्या घातल्या नसतील तर लाल तिखट एक मोठा चमचा घालावे. भाजी सारखी करावी. नंतर भाजीला पाव वाटी डाळीचे पीठ लावावे. झाकण न घालता वाफ आणावी. याला डाळीचे पीठ न लावता सुद्धा छान लागते. तसेच पिठाऐवजी भाजी शिजवताना मुगाची डाळ पाव वाटी धुऊन टाकण्यास हरकत नाही.

मेथीची भाजी प्रकार २

साहित्य : मेथी जुडी दोन गड्डया, तूरडाळ पाववाटी, लसूण एक गड्डी, डाळीचे पीठ एक डाव, तिखट, मीठ, गूळ, तेल पाव वाटी.

कृती 

भाजी निवडून चिरून स्वच्छ धुऊन घ्यावी. तूरडाळही धुऊन घ्यावा. दोन्ही उकडून घ्यावे. अगर पाणी घालून नुसती गॅसवर शिजवावी. नंतर डावाने घोटून त्यात डाळीचे पीठ घालावे. पातेल्यात तेलाची फोडणी करावी. त्यात लसूण लाल होऊ द्यावा. आता सारखी केलेली भाजी घालावी. फार पाणी घालू नये. साधारण दीड वाटी पाणी पुरते. नंतर मीठ, गूळ घालून शिजू द्यावी. फार घट्टही होऊ देऊ नये ही भाजी दाट छान लागते. 

Aloo Palak Recipe In Marathi | आलू पालक रेसिपी

अंबाडीची भाजी बनवायला शिका | Ambadi Bhaji – मराठी रेसिपी

Aluchi Bhaji Recipe in Marathi | अळूची भाजी बनवा – मराठी रेसिपी

चाकवताची भाजी | Chakwat Bhaji Recipe in Marathi – मराठी रेसिपी

Conclusion 

आत्ता आपण पाहिलं कि Methichi Bhaji कशी बनवायची. यामध्ये आपण 2 पद्धतीने कृती करून बनवायला शिकलो. वरती तुम्ही वाचलात असालच. असच या वेबसाइटला भेट देतजा अशी विनंती. ही रेसिपी आवडली असेल तर Comment आणि Share करायला विसरू नका.


रेसिपी Share करा 👇

2 thoughts on “मेथीची भाजी 2 प्रकारे बनवा | Methichi Bhaji – मराठी रेसिपी

Leave a Reply

Your email address will not be published.