नारळी भात | Narali Bhat Recipe in Marathi – Marathi Recipe

रेसिपी Share करा 👇

नमस्कार, Narali bhat recipe in marathi नारळी भात कसा करायचा. यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती कशी करायची हे सर्व खाली दिले आहे. दोन पद्धतीने बनवणार आहोत. चला पाहू नारळी भात. 

नारळी भात   Narali Bhat Recipe in Marathi – Marathi Recipe

Narali Bhat Recipe in Marathi 

साहित्य

दोन वाट्या वासाचा तांदूळ घावा. दोन वाट्या गूळ, अर्ध्या नारळाचे खोवलेले खोबरे (साधारण एक वाटी) सात-आठ लवंगा, वेलदोडा पूड एक चमचा, तूप पाव वाटी, काजूचे तुकडे दोन चमचे, बेदाणे दोन चमचे, चवीपुरते मीठ घावे. 

कृती 

प्रथम तासभर आधी तांदूळ धुऊन निथळत ठेवावेत. दोन चमचे तुपात लवगा टाकाव्यात. त्या तडतडल्यावर तांदूळ परतून घ्यावेत. साधारणपणे तांदळाच्या दोन ते अडीच पट आधणाचे पाणी ओतावे. चिमूटभर मीठ घालावे. प्रथम भाताला मोठी वाफ येऊ द्यावी. नंतर होत आला को मंद गॅसवर ठेवावा. 

गॅस बंद करून दहा मिनिटे तसाच झाकून ठेवावा. नंतर परातीत किंवा थाळ्यात गार करण्यास ठेवावा. गुळात दोन चमचे पाणी व खोवलेले खोबरे घालून गॅसवर ठेवा. एक चट द्या. नंतर त्यात शिजलेला भात, काजू, वेदाणे, वेलदोड्याची पूड टाका. भात मोकळा होईपर्यंत मंद गॅसवर ठेवा. मधून मधून उलथन्याच्या टोकाने हलवा, म्हणजे भात लवकर मोकळा होतो. व बुडाशी लागत नाही. वरून दोन मोठे चमचे साजूक तूप पातेल्याच्या कडेने भातावर सोडा.  

नारळी भात प्रकार २

साहित्य 

दोन वाट्या वासाचा तांदूळ घावा. दोन वाट्या गूळ, अर्ध्या नारळाचे खोवलेले खोबरे (साधारण एक वाटी) सात-आठ लवंगा, वेलदोडा पूड एक चमचा, तूप पाव वाटी, काजूचे तुकडे दोन चमचे, बेदाणे दोन चमचे, चवीपुरते मीठ घावे. 

कृती 

भात वरील पद्धतीने शिजवून घ्यावा. पाच मिनिटे तसाच झाकून ठेवावा. मुरल्यावर त्यातच खोवलेले खोबरे, गूळ, काजू बेदाणे, वेलदोडा पूड टाकावी. भाताच्या वाफेच्या पाण्यात गूळ, खोबरे आपोआप शिजते. एक मोठा चट द्या. नंतर गॅस मंद करा. झाकण घालून ठेवा. भात खाली लागत आहे असे वाटले तर गॅसवर तवा ठेवून त्यावर भाताचे पातेले ठेवावे. म्हणजे बुडाशी न लागता मोकळा शिजेल. व बराच वेळ गरम राहील. वेलदोड्याची पूड कमी असल्यास वेलदोड्याची पूड अर्धा चमचा व जायफळाची पूड अर्धा चमचा घातल्यानेही स्वाद छान येतो.

मसाले भात पटकन बनवा | Masale Bhat Recipe in Marathi – Marathi Recipe

साखर भात | Sakhar Bhat Recipe in Marathi | भात पुलाव – Marathi Recipe

झटपट पुलाव | Pulav Recipe in Marathi | भात पुलाव – Marathi Recipe

Conclusion 

आत्ता आपण पाहिलं कि नारळी भात, Narali Bhat Recipe कशी बनवायची. यामध्ये आपण दोन पद्धतीने बनवायला शिकलो. वरती तुम्ही वाचलात असालच. ही रेसिपी आवडल्या असेल तर Comment आणि Share करायला विसरू नका.


रेसिपी Share करा 👇

6 thoughts on “नारळी भात | Narali Bhat Recipe in Marathi – Marathi Recipe

Leave a Reply

Your email address will not be published.