BEST पनीर कोफ्ता रेसिपी । Paneer Kofta Recipe In Marathi

रेसिपी Share करा 👇

पनीर कोफ्ता ही एक लज़ीज रेसिपी आहे. अनेक चांगल्या मसाल्यांनी कोफ्ताची ग्रेव्ही बनविली जाते. बनवलेली ग्रेव्ही कोफ्तामध्ये समाविष्ट केली जाते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पनीर कोफ्ता ही रेसिपी आवडते, तुम्हला पण नक्कीच आवडत असेल! Paneer Kofta Recipe In Marathi या बद्दल माहिती घ्या. 

this recipe is also available in (English)

सोप्या स्वरूपात सांगायचं असं कि, कोफ्तासमध्ये ग्राउंड मीटचे गोळे असतात. या मध्ये आपण पनीर, बटाटा, कांदे  मसाले यांचा वापर करणार आहोत. प्रामुख्याने व्हेज कोफ्ता पनीर पंजाब मध्ये लोकप्रिय रेसिपी आहे. यालाच मलाई कोफ्ता असे पण म्हणतात किंवा यानावाने पण ओळखतात. 

पनीर कोफ्त्याला सर्व्ह कसे करावे: 

डिनर पार्टी, बर्थडे, संडे किंवा खास प्रसंगी पनीर कोफ्ता बनवू शकता. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नान किंवा रोटी देखील पनीर कोफ्त्या सोबत सर्व्ह करू शकता.

कोफ्ता डिशचे शाब्दिक भाषांतर म्हणजे, मलई / लोणी आणि कोफ्ता = छान मसालेदार गोळे (या प्रकरणात बटाटे आणि पनीर यांचा उपयोग). या रेसिपी ब्लॉग मध्ये आपण दोन प्रकारे Paneer Kofta बनवणार आहे. 

पनीर कोफ्ता हि डिश बनवण्याच्या आधी हे लक्षात घ्या,

कोफ्ता बनवण्याआधी: रेसिपीचे साहित्य एकत्र छान मिसळा, त्यांना व्यवस्थित गोल गोल आकार द्या आणि लहान तुकड्यांमध्ये कोफ्त्याला खोल तळावे. अशा पद्धतीने कोफ्ता छान तयार होतो .

ग्रेव्ही तयार करण्याआधी: ग्रेव्हीचे वैशिष्ट्य म्हणजे गुळगुळीत मसालेदार चव. या ग्रेव्हीमध्ये पनीर जोडला जात नाही. कोफ्ता ग्रेव्ही थोडासा कांदा, टोमॅटो, काजू आणि मलईने बनवलेल्या कढीपत्त्याची भाजी आहे. 

नंतर कोफ्ता, ग्रेव्ही मध्ये बुडण्याची वेळी. कोफ्त्याला ४ ते ५ मिनिट ग्रेव्हीमध्ये उकळावे. कारण ते ग्रेव्ही स्वाद शोषून घेतात आणि खूप छान खाताना चव येते. 

आपल्या घरी सोप्या, Quick आणि सोप्या पद्धतीने ही कृती बनवा आणि खाली दिलेल्या टिप्पण्यांमध्ये आपला अनुभव आमच्याबरोबर सामायिक करा.

तयारीची वेळः 10 मिनिटे

कूक वेळः 45 मिनिटे

एकूण कूक वेळ: 55 मिनिटे

BEST पनीर कोफ्ता रेसिपी । Paneer Kofta Recipe In Marathi - Marathi Recipe

Paneer Kofta Recipe In Marathi । लज़ीज पनीर कोफ्ता रेसिपी 

प्रकार १

साहित्य (कोफ्त्यासाठी) 

१ वाटी किसलेले पनीर 

उकडलेला एक मोठा बटाटा

२ चमचे काजूचे तुकडे 

कॉर्नफ्लोअर दीड चमचा

भाजून कुटलेली बडीशेप १ चमचा

१ चमचा लिंबाचा रस

लाल तिखट १ चमचा

चवीनुसार मीठ

गरजेनुसार तेल

साहित्य (करीसाठी) 

कांदा टोमॅटो प्युरी (Sauce) 

१ मध्यम आकाराचे मक्याचे कणीस

हळद चिमूटभर

धनेपूड १ चमचा

१ चमचा लाल तिखट

मिरपूड चिमूटभर

आलंलसूण पेस्ट १ चमचा

जिरेपूड अर्धा चमचा

गरजेनुसार तेल किंवा बटर 

चवीनुसार मीठ

कृती (करीसाठी) 

पनीर कोफ्ता रेसिपी

Step 1

आधी एक मध्यम कांदा व एक मोठा टोमॅटो, उकडून त्याची प्युरी करून घ्यावी. तसेच मक्याचे दाणे काढून त्यात थोडे कोमट पाणी घालून मिक्सरमधून कढून घ्यावेत. 

त्यातील रस काढून घ्यावा. तसेच उरलेल्या चोथ्यातही पाणी घालून रस गाळून घ्यावा. 

Step 2

कढईत तेल किंवा बटर गरम करायला ठेवावे. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे. आता यात कांदा टोमॅटो प्युरी घालून, थोडावेळ परतून घ्यावे. 

Step 3

नंतर यात हळद, धनेपूड, लाल तिखट, मिरपूड घालून परतून घ्यावे. त्यात मक्याचा रस घालून चांगले ढवळून घ्यावे. आणि ग्रेव्हीला उकळी येईपर्यंत कोफ्त तयार करून घ्यावा.

paneer kofta recipe । paneer kofta recipe in marathi । malai paneer kofta

कृती (कोफ्त्यासाठी)

पनीर कोफ्ता रेसिपी

Step 1

एका बाऊलमध्ये किसलेले पनीर घ्यावे. त्यात उकडलेला बटाटा किसून घ्यावा. आता यातच काजूचे तुकडे, बडीशेप पूड, लिंबाचा रस, लाल तिखट, चवीनुसार मीठ तसेच कॉर्नफ्लोअर घालून मिश्रण एकजीव करावे. 

Step 2

नंतर तयार मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करून, गरम तेलात गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यावेत. ग्रेव्हीला चांगली उकळी आली की गॅस बंद करावा.  

Step 3

बारीक चिरलेली कोथिंबीर त्यात घालावी. एका डिशमध्ये कोफ्ते ठेवावेत, वरून ग्रेव्ही घालावी. त्यावर थोडे किसलेले पनीर घालून सर्व्ह करावे. 

प्रकार पहिला Paneer Kofta Recipe वरती तुम्ही शिकलात, आत्ता आपण दुसरी पद्धतीने पनीर कोफ्ता पाहणार आहे. 

paneer kofta curry । paneer kofta recipe in marathi । aloo paneer kofta curry

पनीर कोफ्ता मराठी रेसिपी 

प्रकार २ 

साहित्य 

पनीर, ५ कप दूध, १ लिंबू 

आत भरण्यासाठी सारण 

१ मोठे गाजर

१०/१५ फरसबीच्या शेंगा

१ वाटी मटाराचे दाणे

१०।१२ काजू

१/२ वाटी खवा

२ हिरव्या मिरच्या

मीठ

ग्रेव्ही १ मोठा कांदा, ४ मोठे टोमॅटो

मसाला २-४ लसूण पाकळ्या, १ आल्याचा तुकडा, १ कप दही, १ चमचा गरम मसाला, थोडेसे जायफळ, मीठ, तिखट 

पनीर कोफ्ता कृती 

paneer kofta recipe in marathi । kofta | malai kofta recipe

Step 1

दुधाला उकळी आली, की त्यात लिंबाचा रस घालावा. दूध फाटल्यावर खाली उतरवून ठेवावे. नंतर कोमट झाल्यावर चक्क्यासाठी दही बांधतो, तसे हे दूध कपड्यावर ओतून टांगून ठेवावे. हाताने पिळू नये. पाणी आपोआप निथळू द्यावे.

Step 2

टोमॅटो उकळीच्या पाण्यात मिनिटभर ठेवून लगेच गार पाण्यात टाकावेत. नंतर साल काढून बारीक चिरावेत व त्यांचा रस काढावा. 

दह्याखेरीज बाकीचा मसाला बारीक वाटावा. 

Step 3

गाजराचे अगदी बारीक तुकडे करावेत. फरसबी उभी चिरावी. नंतर मटाराचे दाणे, गाजर व फरसबी थोडे मीठ घातलेल्या पाण्यात वाफवून घ्यावी. काजू व मिरच्या बारीक चिराव्यात. नंतर सर्व वस्तू एकत्र करून, सारण तयार ठेवावे.

Step 4

पनीर खूप मळून घ्यावे. हाताला थोडा मैदा लावून घ्यावा व त्याचे छोटे छोटे गोळे करून, वाटीसारखे करून, त्यात वरील भाज्यांचे सारण भरून कोपते करावेत. नंतर तुपात तळून व बाजूला ठेवावेत.

Step 5

थोड्या तेलावर कांदा परतून घ्यावा. बदामी रंगाचा झाला, की त्यावर वाटलेला मसाला व टोमॅटोचा रस घालावा. घुसळलेले दही घालावे. ग्रेव्ही दाटसर झाली, की त्यात कोफ्ते घालून उतरवावे. 

Step 6

आयत्या वेळी पुन्हा गरम करून काचेच्या बाऊलमध्ये ओतावे व गरम आहे, तोच त्यावर वर्खाचा कागद लावावा. ही कोफ्ता करी करण्यासाठी थोड्याफार कौशल्याची गरज आहे.

200g Paneer Kofta Nutrition 

paneer kofta recipe in marathi | पनीर कोफ्ता

Cal 208

Carbs 40g  42%

Fat 20g  47%

Protein 10g  11%

Activity Needed to Burn:

208 calories

31

Minutes of Cycling

21

Minutes of Running

1.2

Hours of Cleaning

निष्कर्ष पनीर कोफ्ता रेसिपी 

आता आपण पाहिले आहे Paneer Kofta Recipe In Marathi (पनीर कोफ्ता रेसिपी). आपण बनवायला शिकलो पनीर कोफ्ता. आम्ही आशा करतो कि तुम्हाला हि रेसिपी खूप आवडली असेल. आपणास ही रेसिपी आवडली असल्यास, Comment करण्यास आणि Share करण्यास विसरू नका. मुख्यपृष्ठास भेट द्या.


रेसिपी Share करा 👇

3 thoughts on “BEST पनीर कोफ्ता रेसिपी । Paneer Kofta Recipe In Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.