झटपट पुलाव | Pulav Recipe in Marathi | भात पुलाव – Marathi Recipe

रेसिपी Share करा 👇

नमस्कार, Pulav Recipe in Marathi पुलाव तर काही जणांना खूपच आवडतो. कमी वेळात छान रेसिपी बनते. आपण या ब्लॉग मध्ये दोन प्रकारे पुलाव रेसिपी बनवायला शिकणार आहोत. तुम्हाला कोणती पद्धत आवडते त्यानुसार बनवू शकता. 

सूचना : पुलाव किवा फ्राईड राइस करण्यासाठी शक्य असेल तर दिल्ली राईस किंवा बासमती किंवा चित्र तांदूळ वापरावा. या तांदळाचा भात मोकळा होतो.

Pulav Recipe in Marathi

झटपट पुलाव  Pulav Recipe in Marathi  भात पुलाव - Marathi Recipe

साहित्य 

बासमती किवा दिल्लीराईस तांदूळ तीन वाट्या भरून घावे. फरसबी, गाजर, फ्लॉवर या भाज्यांचे तुकडे प्रत्येकी पाव वाटी, कांद्याचे उभे काप एक वाटी, बटाट्याचे उभे, लांबट काप पाऊण वाटी, काजू तुकडे किंवा सबंध पाव वाटी घावे, बेदाणे दोन चमचे, मटार पाऊण वाटी, तमालपत्राची चार-पाच पाने, दालचिनीचे एक इंचाएवढे चार तुकडे, एक चमचा मिरे, एक चमचा जिरे, एक चमचा शहाजिरे, चार लवंगा, दोन वेलदोडे, तूप पाऊण वाटी, भाज्या परतण्यासाठी थोडे तेल, मीठ एवढे साहित्य घावे. 

कृती 

प्रथम तांदूळ धुऊन कोरडे करण्यास ठेवावेत. फ्लॉवरची छोटी फुले, गाजराचे व फरसबीचे लांबट तुकडे करावेत.  कांदा-बटाट्याचे उभे काप करावेत. कांदा सोडून सर्व भाज्या पाच मिनिटे गरम पाण्यात झाकून ठेवाव्यात. पाणी गार झाल्यावर साधारण पाच ते दहा मिनिटाने भाज्या चाळणीत कोरड्या करण्यास ठेवाव्यात. 

प्रत्येक भाजी वेगवेगळी तेलावर परतून घ्यावी. कांदा तळून घ्यावा. या सर्व भाज्या तळून घेण्यास साधारण अर्धा ते पाऊण वाटी रिफाईंड तेल घ्यावे. उरलेल्या तेलाचा भाजीच्या फोडणीसाठी उपयोग करावा. काजूही तळून घ्यावेत. मटार गरम पाण्यातून काढून तसेच ठेवावेत. 

मटाराच्या पाण्यात किंचित सोडा घालावा. म्हणजे रंग हिरवागार राहतो. तुपावर तमालपत्र घालून तांदूळ चांगले परतून घ्यावेत. व तांदळाच्या दीड ते दुप्पट आधणाचे पाणी ओतावे. भात मोकळा शिजू द्यावा. नंतर तो गार करण्यास परातीत पसरवा.

वेलदोडे, दालचिनी, मिरे, जिरे, शहाजिरे, लवंग यांची पूड करावी. या पुडीचे दोन भाग करावेत. एक भाग व मीठ भाज्यांवर व दुसरा भाग थोडेसे मीठ भातावर पसरावे. उलथन्याच्या टोकाने सारखे करावे. मोठ्या पातेल्यात भात व भाज्या, वाफवलेला मटार घालून अलगद हाताने सारखा करावा. भात सारखा केल्यावर वरून थोडे तूप सोडावे वरून तळलेला कांदा व काजू पेरावेत.

थोडेसे (छोटा पाव चमचा) केशर घ्यावे. ते गरम करून बारीक करावे. एक चमचा पाण्यात अगर दुधात खलावे व शिजलेल्या भातापैकी एक वाटी भात वेगळा घेऊन त्यावर पसरावे. व तो केशरी भात पुलाव्यात मिसळल्याने छान दिसतो.

झटपट पुलाव कसा बनवावा/ Pulav Recipe in Marathi

साहित्य 

तांदूळ तीन वाट्या घावे, घरात असतील तशा व त्या प्रमाणात भाज्यांचे तुकडे, कोणतीच भाजी नसल्यास दोन कांदे दोन मोठे बटाटे, लसूण दहा-बारा पाकळ्या, आले एक इंच, चार लवंगा, दालचिनी चार तुकडे, जिरे एक चमचा, शहाजिरे अर्धा चमचा, काळी मिरी एक चमचा, काजूचे तुकडे दोन चमचे, वेलदोडे दोन, तूप किया रिफाईड तेल पाव वाटी हे साहित्य घावे.

कृती 

प्रथम तांदूळ धुऊन निथळत ठेवावेत. बटाटा व कांद्याच्या उभ्या फोडी कराव्यात. दालचिनी, जिरे, मिरे, शहाजिरे बारीक करून घ्यावेत. आले, लसूण वाटून घ्यावे. बटाट्याच्या फोडी गरम पाण्यात टाकून झाकून ठेवाव्यात. पाच मिनिटांनी चाळणीत निथळत ठेवाव्यात. तूप किंवा तेल तापत ठेवून तमालपत्राची चार पाने टाकावीत.

त्यातच वाटलेला मसाला व बारीक केलेला मसाला, कांदा चांगला परतावा. तांदूळ परतून घेऊन काजूचे तुकडे, वेलदोड्याचे दाणे टाकावेत. तांदळाच्या दुप्पट आधणाचे पाणी घालावे, मीठ घालावे. प्रथम पाच मिनिटे मोठ्या गॅसवर शिजवावा. नंतर पुलाव हलवून गॅस बेताचा ठेवावा.

असा पुलाव प्रेशरकुकरमध्येही करता येतो. मात्र अशा वेळेस पाणी जरा कमी घालावे. पुलाव झाकण न लावता पाच मिनिटे शिजू द्यावा. नंतर प्रेशर न लावता झाकण लावावे. साधारण पाच ते सात मिनिटाने गॅस बंद करून प्रेशर लावावे. कामाची गडबड असल्यास असा पुलाव केल्यास वरचेवर बघावा लागत नाही.

या पण रेसिपी Try करा,

नारळी भात | Narali Bhat Recipe in Marathi – Marathi Recipe

साखर भात | Sakhar Bhat Recipe in Marathi | भात पुलाव – Marathi Recipe

सुरणाची भाजी | Suranachi Bhaji Recipe in Marathi – Marathi Recipe

वांगी भाजी | Vangi Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe

बटाटा भाजी | Batata Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe

Conclusion 

आत्ता आपण पाहिलं कि पुलाव रेसिपी, Pulav recipe in marathi कशी बनवायची. यामध्ये आपण दोन पद्धतीने बनवायला शिकलो. वरती तुम्ही वाचलात असालच, त्या प्रमाणे तुम्हाला कोणती पद्धत आवडते त्यानुसार तयार करू शकता. या रेसिपी आवडल्या असेल तर Comment आणि Share करायला विसरू नका.


रेसिपी Share करा 👇