रगडा पॅटिस बनवायला शिकू | Ragda Pattice Recipe Marathi

रेसिपी Share करा 👇

मस्त रगडा पॅटीस बनवणार आहोत. कोणते साहित्य लागते? कृती कशी करायची? त्याच प्रमाणे नुसतं पॅटीस कस तयार करायच हे पण पाहणार आहे. Ragda Pattice Recipe Marathi बनवायला शिकू.

Ragda Pattice Recipe Marathi (रगडा पॅटिस)

रगडा पॅटिस बनवायला शिकू | Ragda Pattice Recipe Marathi | Marathirecipe.net

साहित्य प्रकार १

१/२ कप पांढरे वाटाणे, २ मोठे कांदे, २ मोठे टोमेंटो, १ इंच आले, ६ हिरव्या मिरच्या, ४ लसूण-पाकळ्या, ३ चमचे आमचूर (वाळवलेल्या कैरीचा चुरा किंवा थोडी चिंच). २ कोथिंबीर, १/२ चमचा जिरे, १ चमचा धने, १/२ चमचा हळद, १ चमवा गरम मसाला, चिमूटभर सोडा, मीठ.

कृती रगडा पॅटिस?

आदल्या दिवशी रात्री वाटाणे भिजत घालावेत. नंतर दुसऱ्या दिवशी थोडा सोडा व मीठ घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावेत व बाजूला ठेवावेत. आले, लसूण, धने, हळद, आमचूर व गरम मसाला सर्व एकत्र करून बारीक वाटावे.

थोड्या तेलाची जिरे घालून फोडणी करावी. बारीक चिरलेला कांदा घालून बदामी रंगाचा होईपर्यंत परतावा. नंतर त्यात वाटलेला मसाला घालून जरा परतावे. पाण्याचा एक हबका द्यावा व पुन्हा परतावे. नंतर त्यावर शिजलेले वाटाणे व वाटाण्यातले थोडे पाणी घालावे. मीठ घालावे. रस दाटसर झाला, की उतरवावे. वरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. सर्व्ह करताना अगदी गरम सर्व्ह करावे.

Literature type 1

1/2 cup white peas, 2 large onions, 2 large tomatoes, 1 inch ginger, 6 green chillies, 4 garlic cloves, 3 tbsp amchoor (dried curry powder or a little tamarind). 2 cilantro, 1/2 tsp cumin seeds, 1 tsp coriander, 1/2 tsp turmeric powder, 1 tsp garam masala, pinch soda, salt.

Ragda Patties Recipe?

Soak the peas the night before. The next day, add a little soda and salt, cook in a pressure cooker and set aside. Combine ginger, garlic, coriander, turmeric powder, amchoor and garam masala.

Add a little oil and cumin seeds. Add finely chopped onion and saut till brown. Then add ground masala and saute for a while. Add a pinch of water and stir again. Then add cooked peas and a little water from the peas. Add salt. When the juice thickens, take it off. Add finely chopped cilantro on top. Serve very hot while serving.

छोले भटुरे | Chole Bhature Recipe In Marathi

भेळ पुरी पटकन बनवा | Bhel Puri Recipe In Marathi

पाणीपुरीचे पाणी । Pani Puri Che Pani Recipe In Marathi

Idli Sambar Recipe In Marathi | इडली सांबार

पॅटिस (Pattice Recipe Marathi)

साहित्य प्रकार २

४०० ग्रॅम मोठे बटाटे, ४ ते ५ ब्रेडचे स्लाईस, १ मोठा कांदा, ३-४ हिरव्या मिरच्या, १ मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर, १/२ चमचा गरम मसाला, १/४ चमचा लाल तिखट, १/८ चमचा हळद, १/४ चमचा जिरे, मीठ.

कृती पॅटिस?

बटाटे उकडून, सोलून घ्यावेत व गरम असतानाच पुरणयंत्रातून काढावेत किंवा किसून घ्यावेत. कांदा, मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरावी. ब्रेड थोडा वेळ पाण्यात भिजत घालून, घट्ट पिळून घ्यावी. नंतर ब्रेडचा चुरा, बटाटे व थोडे मीठ एकत्र करून, साधारण मळून ठेवावे.

थोड्या तेलाची जिरे-हळद घालून फोडणी करावी. मिरच्या व कांदा टाकून परतावे. कांदा लालसर झाला, की त्यावर मीठ, तिखट, गरम मसाला घालून उतरवावे. खाली उतरल्यावर त्यात कोथिंबीर घालून मिश्रण सारखे करावे.

नंतर ब्रेड व बटाट्याच्या मिश्रणाची पारी करून, त्यात वरील कोथिंबिरीचे पुरण थोडेसे भरून, पारीचे तोंड बंद करावे. नंतर हलक्या हाताने कटलेटचा आकार द्यावा. नंतर तव्यावर अगदी थोडे तेल घालून शॅलो फ्राय करावे. प्रत्येक प्लेटमध्ये २ पॅटिस व डावभर रगडा घालून गरमगरमच सर्व्ह करावे.

Patties Literature 

400 gms big potatoes, 4 to 5 slices of bread, 1 large onion, 3-4 green chillies, 1 handful of finely chopped cilantro, 1/2 tsp garam masala, 1/4 tsp red chili powder, 1/8 tsp turmeric powder, 1/4 tsp Tablespoon cumin seeds, salt.

Pattice Recipe?

Boil, peel and grate the potatoes while they are still hot. Finely chop onion, chilli, cilantro. Soak the bread in water for a while and squeeze it. Then add bread crumbs, potatoes and a pinch of salt and knead.

Add a little oil, cumin seeds and turmeric powder. Add chilies and onion and saut. When onion turns red, add salt, red chilli powder and garam masala. When it comes down, add cilantro and mix well.

Then slice the bread and potato mixture, fill it with a little cilantro filling and close the mouth of the slice. Then lightly shape the cutlet. Then add a little oil to the tawa and fry it shallow. Serve hot with 2 Pattice in each plate.

Conclusion

Now we have seen how to make Ragda Pattice Recipe (रगडा पॅटिस). We learned to make (Ragda Pattice Recipe Marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share.


रेसिपी Share करा 👇