Recipe Of Jalebi In Marathi । जिलबी रेसिपी

रेसिपी Share करा 👇

जिलबी हि मिठाईची राणी आहे. जिलबी करताना आपल्याला खूप टेन्शन येत, कारण ते बरोबर होतील का नाही. पण तुम्ही रिलॅक्स राहा आज आपण जिलबी रेसिपी बनवायला शिकणार आहेत. Recipe Of Jalebi In Marathi चला पाहू. 

Recipe Of Jalebi In Marathi (जिलबी)

साहित्य 

१/२ किलो मैदा

एक टेबलस्पून डाळीचे पीठ

१ टेबलस्पून तांदुळाचे पीठ

४ टेबलस्पून दही

२ लिंबांचा रस

२ टेबलस्पून डालडा

७५० ग्रॅम साखर

Recipe Of Jalebi In Marathi । जिलबी रेसिपी - Marathi Recipe

जिलबी रेसिपी कृती? 

परातीत डालडा फेसून घ्यावा. नंतर त्यात मैदा व बाकीची दोन्ही पिठे घालावीत. त्यातच दोन लिंबाचा रस व दही घालावे.  कोमट पाण्याने भज्याच्या पिठापेक्षा जरा घट्ट पीठ भिजवावे. 

पिठाची गुठळी राहू देऊ नये. नंतर हे पीठ स्टीलच्या जरा मोठ्या डब्यात घालून, रात्रभर झाकून ठेवावे.

दुसऱ्या दिवशी साखरेत २ फुलपात्रे पाणी घालून एकतारी पाक करावा. पाकात थोडे केशर, केशरी रंग व रोझ इसेन्स टाकावा.

लहान परातीत भरपूर तूप घालून स्टोव्हवर परात ठेवावी.

जिलबी करण्यापूर्वी पीठ खूप घोटून घ्यावे. नारळाची करवंटी स्वच्छ करून, त्यांतील तीन डोळ्यांपैकी एक डोळा फोडून, त्यात डावेने पीठ भरून, परातीत जिलब्या घालाव्यात. 

नारळाची करवंटी परातीच्या जवळ धारावी, म्हणजे जाड नळी पडेल. 

५-६ जिलब्या एका धारेने सावकाश घालाव्यात. बारीक कात्रीने कापून जिलब्या सुट्या कराव्यात उलटून तळाव्यात व विणायच्या सुईने उचलून जरा निथळून पाकात टाकाव्यात. 

पाक गरम असावा. पहिल्या जिलब्या पाकात टाकल्या, की परातीत दुसऱ्या जिलब्या तळण्यासाठी घालाव्यात. त्या काढून पाकात टाकण्यापूर्वी पहिल्या पाकातल्या जिलब्या विणायच्या सुईने उचलून ताटात ठेवाव्यात. 

जिलबी घालण्यासाठी हल्ली एक पॅस्टिकची बाटली मिळते. तिच्यात पीठ भरून, वाटली दाबून जिलव्या घालाव्यात. 

जिलबी करण्यास तशी मेहनत काहीच नाही. फक्त थोडा अनुभव आला, की जिलब्या छान जमतात. 

थंडीच्या दिवसांत आणखी एक दिवस अगोदर पीठ भिजवावे. म्हणजे पीठ छान आंबते व जिलबी चांगली होते.

हे पण वाचा,

Gulab Jamun Recipe In Marathi | गुलाब जामुन रेसिपी

Shrikhand Recipe In Marathi | श्रीखंड रेसिपी

Turichya Dalichi Amti | तुरीच्या डाळीची आमटी

Tomato Soup Recipe In Marathi | टोमॅटो सूप रेसिपी

Literature (Recipe Of Jalebi In Marathi)

1/2 kg flour

A tablespoon of dal flour

1 tablespoon rice flour

4 tablespoons yogurt

2 lemon juice

Pour 2 tablespoons

750 grams of sugar

Recipe Of Jalebi?

Put Dalda in a pan. Then add flour and the rest of the flour. Add two lemon juice and curd.

Soak the dough with lukewarm water.

Do not leave lumps of dough. Then place the flour in a large steel box and cover it overnight.

The next day, add 2 cups of water with sugar and cook at once. Add a little saffron, orange color, and rose essence.

Put a lot of ghee in a small pan and put it on the stove.

Knead the flour well before making jalebi.

Clean the coconut husk, break one of the three eyes, fill it with flour to the left,

Add jilbabs to the pan.

Drain the coconut near the pan, so that a thick tube falls.

Slowly add 5-6 jalebi in one stream. Cut the jalebis with fine scissors, turn them upside down, fry them and pick them up with a knitting needle.

The cooking should be hot. Put the first jalebi in the pan, then add the second jalebi in the pan for frying. 

Before removing them and putting them in the pan, the first cooked jalebi should be picked up with a knitting needle and placed in a tray.

Nowadays I get a plastic bottle to put on. Fill it with flour and press it.

There is no such thing as hard work. Just got a little experience, that jalebi comes together nicely.

On cold days, soak the flour one more day in advance. This means that the flour is nicely fermented and the jalebi is good.

Basundi Recipe In Marathi | बासुंदी रेसिपी । बासुंदी कशी बनवायची

Rasgulla Recipe In Marathi | रसगुल्ला रेसिपी

Conclusion

Now we have seen How to make Recipe Of Jalebi (जिलबी रेसिपी). We learned to make (Recipe Of Jalebi In Marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share. Visit Home Page.


रेसिपी Share करा 👇