साखर भात | Sakhar Bhat Recipe in Marathi | भात पुलाव – Marathi Recipe
नमस्कार, Sakhar bhat recipe in marathi लहान असताना आपण किती साखर भात खात होतो. तसाच छान साखर भात आज आपण बनवणार आहोत. यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती कशी करायची हे खाली वेवस्तीत दिलेले आहे. तुम्ही हा रेसिपी ब्लॉग पूर्ण वाचा आणि Sakhar Bhat बनवा चला पाहूया.

Sakhar Bhat Recipe in Marathi
साहित्य
दोन वाट्या वासाचा तांदूळ घावा. अडीच वाटी साखर, अधी वाटी तूप, पाच-सहा लवंगा, काजू किंवा बदामाचे तुकडे दोन चमचे, बेदाणे दोन चमचे, वेलदोडा पूड एक मोठा चमचा, खाण्याचा केशरी रंग, थोडेसे असल्यास केशर घावे.
कृती
प्रथम तांदूळ धुऊन कोरडे करण्यास ठेवावे. एकीकडे भातासाठी तांदळाच्या दुप्पट पाणी गरम करण्यास ठेवावे. दुसऱ्या गॅसवर पाव वाटी तुपावर लवंगा परतून घ्याव्यात. तांदूळही परतावेत. नंतर गरम करण्यास ठेवलेले उकळते पाणी भातात ओतावे.
किचित चवीपुरते मीठ घालून भात मोकळा शिजवावा. तो परातीत गार करण्यास ठेवावा. नतर पातेल्यात साखरेत पाव वाटी पाणी घालून पाक करण्यास ठेवावे. साखर पाण्यात विरघळेपर्यंत हलवावे. पाक पक्का झाला की त्यात खाण्याचा रंग चिमूटभर, केशराची पूड पाव चमचा, काजूचे तुकडे, बेदाणे घालून भात घालावा. त्यावर वेलदोड्याची पूड टाकून मंद गॅसवर वाफ येऊ द्यावी.
भात घातल्यावर पाक पुन्हा थोडा सैल होतो. भात झाला की खाली तवा ठेवून पाच मिनिटे गॅसवर ठेवावा. म्हणजे बराच वेळ गरम राहील. सर्व भात शिजल्यावर वरून पाव वाटी साजूक तूप सोडावे व झाकून ठेवावा.
काजू किंवा बदाम नसल्यास नारळी किंवा साखरभातात (sakharbhat) घालण्यासाठी दोन डाव शेंगदाणे तासभर भिजत घालावेत. त्याची साले सुटल्यावर चार चार तुकडे करून काजूऐवजी घातले तरी छान भात लागतो.
सकाळचा पांढरा भात मोकळा झाला असेल व तो जास्त राहिला तर संध्याकाळच्या जेवणात त्याचा नारळीभात किंवा साखरभात केला तरी छान लागतो. पद्धत सर्व वरीलप्रमाणेच, फक्त तो भात तुपावर शिजलेला असल्याने व त्यात लवंगा नसल्याने वेलदोड्याच्या पुडीबरोबर चार लवंगा कुटून घालाव्यात.
नारळी भात | Narali Bhat Recipe in Marathi – Marathi Recipe
झटपट पुलाव | Pulav Recipe in Marathi | भात पुलाव – Marathi Recipe
सुरणाची भाजी | Suranachi Bhaji Recipe in Marathi – Marathi Recipe
वांगी भाजी | Vangi Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe
बटाटा भाजी | Batata Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe
Conclusion
आत्ता आपण पाहिलं कि साखर भात, Sakhar bhat recipe in marathi कशी बनवायची. यामध्ये आपण काजू बदामाचे तुकडे घालून या पद्धतीने बनवायला शिकलो. वरती तुम्ही वाचलात असालच. ही रेसिपी आवडल्या असेल तर Comment आणि Share करायला विसरू नका.
Pingback: झटपट पुलाव | Pulav Recipe in Marathi | भात पुलाव - Marathi Recipe
Pingback: बटाटा भाजी | Batata Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या - Marathi Recipe
Pingback: मसाले भात पटकन बनवा । Masale Bhat Recipe in Marathi - Marathi Recipe
Pingback: नारळी भात | Narali Bhat Recipe in Marathi – Marathi Recipe
Pingback: मटकीची उसळ बनवायला शिकू । Matki Chi Usal - मराठी रेसिपी
Pingback: कटाची आमटी | Katachi Amti Recipe in Marathi - मराठी रेसिपी
Pingback: Annietur (annietur123) | Pearltrees
Pingback: Shankarpali Recipe In Marathi • स्वादिष्ट आणि खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी
Pingback: Dahi Vada Recipe Marathi • हॉटेल सारखा दही वडा रेसिपी • Dahi Vada
Pingback: Chakali Recipes In Marathi • झटपट कुरकुरीत खमंग चकली रेसिपीस