मस्त हॉटेल सारखा सांबर बनवायला शिका | Sambar Recipe In Marathi
नमस्कार, मस्त हॉटेल सारखा सांबर बनवायला शिका, sambar recipe in marathi. यासाठी कोणते लागते? कृती कशी करायची? हे सर्व ब्लॉग मध्ये दिले आहे. चला पाहू Idli sambar किंवा Vada sambar पण तुम्ही म्हणू शकता.

SAMBAR RECIPE IN MARATHI
साहित्य
तूरडाळ अधी वाटी घावे. दुधी भोपळ्याच्या अर्धी वाटी फोडी, एक कांदा चिरून, लिंबाएवढी चिंच किंवा एक मोठा टोमॅटो, लाल मिरच्या सात-आठ किंवा तिखट एक मोठा चमचा, सांबार मसाला दोन चमचे, दोन डाव फोडणीसाठी तेल, कोथिवीर, ओले किवा सुके खोबरे, कढीलिंबाची पाने.
कृती
तुरीची डाळ थोडेसे तेल व हळद घालून शिजवावी. तेलाची हिंग, मोहरी, हळद कढीलिंबाची पाने टाकून फोडणी करावी. त्यातच दुध्या भोपळ्याच्या फोडी कांदा व मिरच्याचे तुकडे परतावेत. चार वाट्या पाणी गरम किंवा गार घालावे. शिजलेली डाळ घालावी.
नंतर कोळलेली चिच, गुळ, मीठ व सांबार मसाला, खोबरे, कोथिंबीर घालून सांबार (sambar) चांगले उकळू द्यावे. चिंचेच्या कोळाऐवजी आवडत असल्यास टोमॅटो घालावा. किंवा चिंच कमी घालून छोट्या टोमॅटोच्या फोडी घालाव्यात. सांबार दाट हवे असल्यास चवीसाठी एखादा छोटा बटाटा बारीक तुकडे करून घालावा.
खूप दाट वाटल्यास किंवा जास्त हवे असल्यास पाण्याचे प्रमाण वाढवावे. सांबार जसे गार होत जाते तसे आळते. यात टोमॅटो किंवा चिंच नाही घातली तरी चालते. मात्र त्या वेळेस गूळ घालू नये.
टीप (Sambar recipe)
हल्ली बहुतेक शहरांतून निरनिराळ्या कंपन्यांचा सांबार मसाला मिळतो. तो वापरण्यास हरकत नाही. कारण आपण वरचेवर सांबार करत नसल्याने मसाला जास्त लागत नाही. करून ठेवलेला जास्त दिवस राहिल्यास त्याचा वास कमी होतो.
हे पण वाचा
सुरणाची भाजी | Suranachi Bhaji Recipe in Marathi – Marathi Recipe
वांगी भाजी | Vangi Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe
बटाटा भाजी | Batata Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe
Aluchi Bhaji Recipe in Marathi | अळूची भाजी बनवा – मराठी रेसिपी
चाकवताची भाजी | Chakwat Bhaji Recipe in Marathi – मराठी रेसिपी
Turichya Dalichi Amti | तुरीच्या डाळीची आमटी
Conclusion
आत्ता आपण पाहिलं कि सांबर कसे बनवायचे. यामध्ये आपण कृती करून sambar recipe in marathi मध्ये बनवायला शिकलो. वरती तुम्ही वाचलात असालच. असच या वेबसाइटला भेट देतजा अशी विनंती. ही रेसिपी आवडली असेल तर Comment आणि Share करायला विसरू नका.
Pingback: कटाची आमटी | Katachi Amti Recipe in Marathi - मराठी रेसिपी
Pingback: Annietur (annietur123) | Pearltrees
Pingback: Turichya Dalichi Amti • तुरीच्या डाळीची आमटी - Marathi Recipe
Pingback: Tomato Soup Recipe In Marathi • टोमॅटो सूप रेसिपी - Marathi Recipe
Pingback: Aluchi Patal Bhaji • अळूची पातळ भाजी - Marathi Recipe
Pingback: Kofta Curry Recipe In Marathi • चमचमीत दूधी भोपळ्याची कोफ्ता करी रेसिपी
Pingback: Kadhi Recipe In Marathi • चटपटीत ताकाची कढी रेसिपी • गरमा गरम Kadhi
Pingback: Tomato Saar Recipe In Marathi • झटपट चविष्ट टोमॅटो सार रेसिपी