Turichya Dalichi Amti | तुरीच्या डाळीची आमटी
खूप सुंदर पद्धतीने Turichya Dalichi Amti बनवणार आहे. तुम्ही पण या प्रकारे तयार करा. कोणते साहित्य लागते? कृती कशी करायची? हे सर्व खाली दिले आहे. चला पाहू तुरीच्या डाळीची आमटी.
(तुरीच्या डाळीची आमटी) Turichya Dalichi Amti

साहित्य
तूरडाळ अर्धी वाटी
१ चमचा तिखट
पाऊण चमचा मीठ
लहान लिंबाएवढी चिंच
अगर दोन आमसुले
गूळ, काळा मसाला एक चमचा
कढीलिंब, सुके किंवा ओले खोबरे,
मोठा चमचा कोथिंबीर
१ मोठा डाव तेल
फोडणी करण्याकरिता मोहरी, हिंग, हळद घावे.
तुरीच्या डाळीची आमटी कृती?
प्रथम तुरीची डाळ कुकरमध्ये अगर तशीच शिजवून घ्यावी. डाळ शिजवताना त्यात किंचित हळद व थोडेसे तेल टाकावे.
शिजलेली डाळ घोटून घ्यावी. तेलाची मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी.
फोडणीत कढीलिंब व लाल तिखट घालावे. लगेच डाळ ओतावी. म्हणजे खाट उठत नाही.
फोडणीत तिखट घातल्याने रंग, चव वेगळी येते. हवे असेल तेवढे दोन-तीन वाट्या पाणी घालावे.
चिंच कोळून घालावी. गूळ, मीठ, कोथिंबीर, ओले खोबरे घालावे. चांगली आमटी उकळू द्यावी. आमटी दाट हवी असल्यास डाळ थोडी जास्त घालावी. ही चिंच-गुळाची आमटी पातळच चांगली लागते.
आमटीत चिंचेऐवजी टोमॅटोच्या फोडी घातल्या तरी चालतात. तसेच या प्रमाणेच मसुराची किंवा मुगाच्या डाळीचीही आमटी करतात.
टीप
सकाळची आमटी शिल्लक राहिल्यास रात्री त्यास कांद्याची फोडणी करून घातल्यास छान लागते. त्यासाठी एक मध्यम कांदा बारीक चिरावा व छोटा डाव तेलावर फोडणी करून परतावा.
आमटीची उकळी येऊ द्यावी. किंवा कांद्याऐवजी वरून सात-आठ लसणाच्या पाकळ्यांची फोडणी दिल्यासही छान चव येते.
हे पण वाचा,
Tomato Soup Recipe In Marathi | टोमॅटो सूप रेसिपी
मस्त हॉटेल सारखा सांबर बनवायला शिका | Sambar Recipe In Marathi
कटाची आमटी | Katachi Amti Recipe in Marathi – मराठी रेसिपी
Ingredients for Turichya Dalichi Amti
Half a cup of pulses
a teaspoon of chili powder
a pound of salt
a small length of tamarind
Or two amsule, jaggery
a teaspoon of kala masala
curry, dried or wet coconut
Spoon cilantro, a tablespoon of oil
mustard seeds, asafoetida
turmeric powder.
Turichya Dalichi Amti Action?
First, cook the turi dal in the cooker or in the same way. While cooking dal, add a little turmeric and a little oil.
Knead the cooked dal. Add mustard oil, asafoetida and turmeric powder. Add curry leaves and red chili powder.
Pour the dal immediately. That is, the bed does not rise.
Adding red chillies in the frying pan gives a different color and taste. Add two-three cups of water as desired.
Add tamarind paste. Add jaggery, salt, cilantro, wet coconut. Bring good amti to a boil.
If you want thicker amti, add a little more dal. This tamarind-jaggery amti looks good only thin.
It works even if you add tomato slices instead of tamarind. They also make lentils or muga pulses in the same way.
Note
If there is amti left in the morning, it is better to add chopped onion at night. For this, chop a medium onion finely and fry it in oil.
Let the amti boil. Or you can add seven or eight cloves of garlic on top instead of onion.
Conclusion
Now we have seen How to make a Turichya Dalichi Amti (तुरीच्या डाळीची आमटी). We learned to make (Turichya Dalichi Amti). If you like this recipe, don’t forget to comment and share. Visit Home Page.
Pingback: Recipe Of Jalebi In Marathi • जिलबी रेसिपी - Marathi Recipe