झटपट उपवासाचे थालीपीठ सोप्या पद्धतीने । Upvasache thalipeeth

रेसिपी Share करा 👇

साबुदाणा थालीपीठ हे कुरकुरीत आणि मऊ असतात. यालाच आपण मराठी मध्ये Upvasache thalipeeth म्हणतो. साबुदाण्याच्या पाककृती सहसा धार्मिक उपवासाच्या दिवसांसाठी केल्या जातात. येते आपण तीन पद्धतीने बनवायला शिकणार आहेत. 

Upvasache thalipeeth (उपवासाचे थालीपीठ)

प्रकार १ 

थालीपीठ साहित्य

२ वाट्या भाजणी

२ उकडलेले बटाटे

१ वाटी भाजलेल्या दाण्याचे कूट

पाच-सहा हिरव्या मिरच्या किंवा एक ते दीड चमचा लाल तिखट

मीठ, अर्धा चमचा साखर

चतकोर लिंबू किंवा १ चमचा ताक (दोन्हीही नसल्यास चालते.) 

बारीक चिरलेली कोथिंबीर 

१ चमचा तूप किंवा रिफाईड तेल

झटपट उपवासाचे थालीपीठ सोप्या पद्धतीने । Upvasache thalipeeth

उपवासाचे थालीपीठ कसे बनवायचे   

Step 1

उकडलेला बटाटा किसणीवर किसावा अगर हाताने कुस्करावा. नंतर मिरच्या वाटून घ्याव्यात. 

Step 2

भाजणी, बटाटा, दाण्याचे कूट, वाटलेली मिरची, साधारण एक मोठा चमचा मीठ, साखर एकत्र करावे. लिंबू पिळावे. 

Step 3

थोडेसे म्हणजे लागेल तसे पाणी घालून पीठ मळावे. थापता येण्याइतपत गोळा सैल करावा. तवा किंवा कढईला तूप लावावे किंवा रिफाईंड तेल एक चमचा घालावे. 

Step 4

त्यावर साधारण हातात मावेल एवढा गोळा घेऊन पातळ थापावे. झाकण ठेवून मध्यम गॅसवर भाजावे. 

Step 5

चुरचुर आवाज आला की झाकण काढून थालीपीठ उलटावे. तूप सोडून मंद आचेवर झाकण न ठेवता भाजावे. 

साजूक तूप, लोणी किंवा दह्याबरोबर खावयास द्यावे. बटाटा उकडण्याऐवजी किसून घातला तरी चालतो.

थालीपीठसाठी टीप 

फ्रायपॅन मध्ये थालीपीठ लावल्यास तेल किंवा तूप कमी लागते, तळाला चिकटण्याची भीती नाही. एवढ्या मिश्रणाची साधारण मध्यम आकाराची चार ते पाच Upvasache thalipeeth होतात. 

प्रकार २

थालीपीठ साहित्य

भिजलेला साबुदाणा २ वाट्या

दाण्याचे कूट १ वाटी

२ बटाटे उकडून किंवा किसून

असल्यास शिंगाड्याचे पीठ अर्धी वाटी

६-७ मिरच्या अगर लाल तिखट १ चमचा

मीठ, साखर, कोशिंबीर 

तूप किंवा रिफाइंड तेल

१ चमचा जिरे

उपवासाचे थालीपीठ कसे करावे 

upvas recipe in marathi खाली आपण step by step बनवायला शिकू Upvas thalipeeth, 

Step 1

साधारण दीड वाटी साबुदाणा दोन-तीन तास भिजत घालावा. 

Step 2

नंतर भिजवलेला साबुदाणा, दाण्याचे कूट, बटाटा, शिंगाड्याचे पीठ, मिरच्या वाटून मीठ, अर्धा चमचा साखर, बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर, जिरे सर्व एकत्र कालवावे. 

Step 3

भिजलेला साबुदाणा असल्याने याला गोळा मळताना पाणी अगदी बेताचे घालावे. तव्याला एक चमचा तूप लावून गोळा थापावा व वरील पद्धतीने थालीपीठ भाजावे. 

प्रकार ३

थालीपीठ साहित्य

साबुदाणा किंवा शिंगाडे किंवा वऱ्याचे तांदूळ यांपैकी कशाचेही पीठ १ वाटी

दाण्याचे कूट पाऊण वाटी

१ मोठा बटाटा किसून किंवा उकडून

तिखट, मीठ, जिरे, तूप

उपवासाचे थालीपीठ कसे बनवायचे मराठी मध्ये  

खाली आपण step by step करायला Upvasache thalipeeth/ shabudana paratha शिकणार आहे, 

Step 1

कोणत्याही एका पिठात बटाटा, दाण्याचे कूट, एक चमचा तिखट, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा जिरे असे सर्व, थोडेसे ताक व पाणी घालून एकत्र पीठ मळावे. 

Step 2

नंतर प्रकार एकप्रमाणे थालीपीठ लावावे. आयत्या वेळी येणाऱ्या पाहुण्यांसाठी करता येते.

Step 3

एखाद्या वेळेस उपासाला सकाळी आपण वऱ्याचे तांदूळ शिजवतो, बटाटा भाजी करतो. रताळ्याच्या उकडलेल्या फोडी करतो. हे पदार्थ थोडे थोडे उरले सर्व एकत्र करावे. 

Step 4

त्यात साधारण अर्धा ते पाऊण वाटी दाण्याचे कूट, अर्धा वाटी साबुदाणा पीठ किंवा शिंगाड्याचे पीठ, तिखट, मीठ चवीप्रमाणे घालावे. 

त्याची थालीपीठे करावीत म्हणजे सकाळचे पदार्थ न देता वेगळा पदार्थ खावयास देता येतो. 

ते वाया जात नाही किंवा संबंध दिवसाच्या उपवासाला सकाळीच वऱ्याचे तांदूळ थोडे जास्त शिजवून ठेवावेत, म्हणजे संध्याकाळी भिजवलेल्या साबुदाण्यात घालून थालीपीठ किंवा वडे करता येतात.

निष्कर्ष उपवासाचे थालीपीठ

आता आपण पाहिले आहे, Upvasache thalipeeth (थालीपीठ). आपण बनवायला शिकलो Thalipeeth recipe. आम्ही आशा करतो कि तुम्हाला हि रेसिपी खूप आवडली असेल. आपणास ही रेसिपी आवडली असल्यास, Comment करण्यास आणि Share करण्यास विसरू नका. Homepage भेट द्या.


रेसिपी Share करा 👇

One thought on “झटपट उपवासाचे थालीपीठ सोप्या पद्धतीने । Upvasache thalipeeth

Leave a Reply

Your email address will not be published.