वांगी भाजी | Vangi Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe
नमस्कार, वांगी भाजी, वांग्याची भाजी बनवायचे खूप प्रकार आहेत पण चांगले चार पद्धतीने भाजी बनवायला शिकणार आहोत. खाली दिलेल्या पद्धतीने बनवा खूप मस्त वांग्याची भाजी बनेल. चला पाहूया Vangi bhaji recipe in marathi पण भाजी आवडली तर Share करायला विसरू नका.
वांग्याची भाजी कशी बनवतात?

साहित्य
अर्धा किलो वांगी, एक मोठा चमचा तिखट, एक मध्यम चमचा मीठ, चवीपुरती साखर, अर्धी वाटी डाळीचे पीठ, दोन मोठे डाव तेल, फोडणाचे साहित्य (मोहरी, हिंग, हळद).
कृती
प्रथम वांगी छोटी असतील तर त्याचे डेट काढून उभे पातळ काप करावेत. मोठ्या वांग्याचे प्रथम दोन भाग करून नंतर उभे काप करावेत. ते लगेच पाण्यात टाकावेत. म्हणजे काप काळे पडणार नाहीत. नंतर तेलाची फोडणी करून घ्यावी व त्यात वांगी झाकण घालून परतून घ्यावीत. जून वाटल्यास थोडे पाणी घालावे. तिखट, मीठ, साखर घालून सारखी करावी व डाळीचे पीठ लावावे. एक चांगली वाफ येऊ द्यावी. भाजी गॅसवरून खाली उतरवल्यावर ओले किंवा कोरडे खोबरे, कोथिंबीर घालावी.
वांगी भाजी प्रकार २ पद्धतीने/ Vangi Bhaji Recipe in Marathi
साहित्य
दीड पावशेर वांगी, एक मोठा अगर दोन छोटे कांदे, आवडत असल्यास एखादा बटाटा, सात-आठ लसूण पाकळ्या, काळा मसाला एक चमचा, लाल तिखट एक चमचा, मीठ एक चमचा, दाण्याचे अगर तिळाचे कूट पाव वाटी, (दोन्ही समप्रमाणात घातल्यास खमंग चव येते) कोथिबीर.
कृती
प्रथम एका वांग्याच्या आठ फोडी प्रमाणे फोडी कराव्यात. कांदेही मध्यम बारीक अगर उभ्या चकत्या कराव्यात. बटाट्याचे साल काढून त्याच्याही फोडी कराव्यात. वांगी, बटाटा चिरल्यावर लगेच पाण्यात टाकावे. दोन मध्यम डाव तेलाची हिंग, हळद, मोहरी घालून फोडणी करावी. त्यात कांदा परतून घ्यावा. नंतर वांगी व बटाटा फोडी टाकाव्यात. एक वाटीभर पाणी घालावे. लगेच तिखट, मीठ, गूळ, दाण्याचे कूट घालावे. ही भाजी लवकर शिजते. रस कमी वाटल्यास पाणी जास्त घालावे. असल्यास कोथिंबीर घालावी.
साहित्य
दोन मध्यम कांदे, लसणाच्या दहा-बारा पाकळ्या, दीड पाव वांगी(बारीक), दोन मोठे चमचे काळा मसाला, एक चमचा तिखट, दोन चमचे मीठ, मोठ्या लिंबाएवढा गूळ, ओले खोबरे पाव वाटी, तिळाचे कूट पाव वाटी, दाण्याचे कूट एक मोठा चमचा, आल्याचा पाव इंचाचा तुकडा, सात-आठ मियाचे दाणे, दालचिनीचे साधारण एक इंचाचे असे चार तुकडे, अर्धा चमचा गोडे जिरे, कोथिंबीर एक डाव, पाव वाटी फोडणीकरता तेल.
कृती
प्रथम वांगी डेख काढून उभी चिरावीत. त्याचे चार फाके करावेत. परंतु वांगे सबंध राहील असे पहावे. कांदा बारीक चिरावा. लसूण सोलून बारीक करून घ्यावा. दालचिनी, काळी मिरी व जिरे एकत्र बारीक करून घ्यावे. (असल्यास खसखसही दोन चमचे बारीक करावी) नंतर ओले खोबरे, काळा मसाला, तिखट, मीठ, गूळ, तिळाचे व दाण्याचे कूट, बारीक केलेले आले, चिरलेल्यापैकी निम्मा कांदा असे सर्व एकत्र कालवावे व वांगी भरून घ्यावी. बाकी उरलेला मसाला तसाच ठेवावा.
तेल तापत ठेवून हिंग-हळदीची फोडणी करावी. त्यात उरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा लालसर झाल्यावर भरलेली वांगी व उरलेला मसाला घालावा. त्यात दोन वाट्या पाणी घालावे. मसाला भरपूर असल्याने जरूर पडल्यास अर्धी वाटी जास्त पाणी घालावे. भाजी झाकण घालून शिजू द्यावी. प्रथम गॅस मोठा ठेवावा. नंतर साधारणपणे पाच मिनिटाने मंदाग्नीवर शिजू द्यावे. या भाजीत पाणी जास्त झाले तरी भाजी गार झाल्यावर रस आळून येतो या भाजीस नॉनव्हेज रश्शाप्रमाणे चव येत असल्याने वांगी कमी घातली तरी चालतात. या भाजीचा रससुद्धा नुसता छान लागतो.
साहित्य
दीड पाव वांगी, एक मध्यम कांदा, सात-आठ लसूण पाकळ्या. दोन चमचे काळा मसाला, एक चमचा तिखट, मीठ, लिंबाएवढा गूळ, कोथिबार, दाण्याचे किंवा तिळाचे कट पाव वाटी किंवा दोन्ही सम अगर कमा-जास्त प्रमाणात चालेल. कोरडे खोबरे एक मोठा डाव, दोन छोटे डाव तेल, फोडणाच साहित्य.
कृती
प्रथम वांगी डेख काढून चार फाके करावेत. वांगे चिरताना सबंध राहील असे पहावे. कांदा बारीक चिरून घ्यावा. लसूण बारीक वाटून घ्यावा. बाकी सर्व जिन्नस एकत्र कालवावे. व वांगी भरून घ्यावीत. तेलाची फोडणी करून कांदा, लसूण टाकावे. कांदा लालसर झाला की भरलेली वांगी घालावीत. एक वाटी गरम पाणी घालावे. मंदाग्नीवर शिजू द्यावे. वाढताना वरून ओले खोबरे, कोथिंबीर पसरावी.
झटपट पुलाव | Pulav Recipe in Marathi | भात पुलाव – Marathi Recipe
चिकन मसाला | Chicken Masala Recipe in Marathi | 5 पद्धतीने बनवा
चिकन टिक्का | Chicken Tikka Recipe in Marathi – Marathi Recipe
लिंबू लोणचे । Limbu Lonche Recipe in Marathi – Marathi Recipe
सुरणाची भाजी | Suranachi Bhaji Recipe in Marathi | – Marathi Recipe
बटाटा भाजी | Batata Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe
Dahi Vada Recipe Marathi | दही वडा रेसिपी
Conclusion
आपण आत्ता पाहिलं कि वांग्याची भाजी चार प्रकारेने कस बनवायची, Vangi Bhaji. तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर Comment करायला विसरू नका.
Pingback: बटाटा भाजी | Batata Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या - Marathi Recipe
Pingback: सुरणाची भाजी | Suranachi Bhaji Recipe in Marathi | – Marathi Recipe
Pingback: लिंबू लोणचे । Limbu Lonche Recipe in Marathi - Marathi Recipe
Pingback: चिकन टिक्का | Chicken Tikka Recipe in Marathi - Marathi Recipe
Pingback: झटपट पुलाव | Pulav Recipe in Marathi | भात पुलाव - Marathi Recipe
Pingback: Marathirecipe | Pearltrees
Pingback: कोबीची भाजी 3 प्रकारे बनवा । Kobichi Bhaji - मराठी रेसिपी
Pingback: चाकवताची भाजी | Chakwat Bhaji Recipe in Marathi - मराठी रेसिपी
Pingback: मस्त हॉटेल सारखा सांबर बनवायला शिका • Sambar Recipe In Marathi
Pingback: Annietur (annietur123) | Pearltrees
Pingback: Shankarpali Recipe In Marathi • स्वादिष्ट आणि खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी