व्हेजिटेबल बिर्याणी रेसिपी | Vegetable Biryani Recipe In Marathi

रेसिपी Share करा 👇

खूप छान पद्धतीने व्हेजिटेबल बिर्याणी करायला शिकणार आहोत. हि रेसिपी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते? कृती कशी करायची? चला पाहू Vegetable biryani recipe in marathi पूर्ण वाचा आणि Share करा. 

Vegetable Biryani Recipe In Marathi (व्हेजिटेबल बिर्याणी)

व्हेजिटेबल बिर्याणी रेसिपी | Vegetable Biryani Recipe In Marathi - Marathirecipe.net

साहित्य 

२ वाट्या तांदूळ, १ वाटी मुगाची डाळ, ३ मध्यम बटाटे, ३-४ केशरी रंगाची गाजरे, २ टोमेंटो, २ कांदे, १/२ वाटी मटाराचे दाणे, अर्धा नारळ, १ टेबलस्पून बेदाणा, ५ टेबतस्पून काजू, १ टेबलस्पून दाणे, १ १/३ वाटी दही, १ चमचा धने-जिरे पूड, १ दालचिनीचा तुकडा, ५-६ काळी मिरी, ३-४ मिरच्या, १ मूठ चिरलेली कोथिंबीर घावे. 

व्हेजिटेबल बिर्याणी कृती?

डाळ व तांदूळ एक तास आधी घुऊन ठेवावेत. बटाट्याची साले काढून, बेताच्या आकाराच्या फोडी करून, तळून ठेवाव्यात. गाजराचे बेताच्या आकाराचे तुकडे करून गाजर व मटाराचे दाणे वाफवून घ्यावेत. टोमॅटो प्रथम उकळीच्या पाण्यात घालून, नंतर लगेच गार पाण्यात घालून, साल काढून टाकावी. गर हाताने सारखा करावा. कांदा किसून घ्यावा. कांदा, थोडासा नारळाचा चव, मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात. त्यात थोडेसे पाणी घालून जाडसर रस तयार करावा. कांदा व नारळाचा चोथा पिळून काढावा. फक्त जाडसर पाणी ठेवावे. मसाला बारीक वाटून घ्यावा.

आता मोहरी, हिंग, हळद घालून तेलाची फोडणी करावी. डाळ व तांदूळ थोडेसे परतून घ्यावेत. टोमॅटोचा जाडसर रस व नारळाचा रस एकत्र करून त्यात आणखी पाणी घालून तांदुळावर ओतावे. हे पाणी साधारण तीन बोटे तरी तांदुळाच्या वर आले पाहिजे. त्यात मसाला व मीठ घालून, भात शिजवून घ्यावा.

मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात तुपाचा हात फिरवून, थोडा भाताचा थर व थोडा भाज्यांचा थर आलटून पालटून घ्यावा. दह्यात थोडेसे पाणी घालून त्याचा शिपका मधून मधून द्यावा. नंतर पातेल्यावर झाकण ठेवून मंदगरीवर भाताला चांगली बाफ आणावी. भात शिजल्यावर त्यावर झाकणी पालथी घालून दोन निखारे ठेवावेत. काजू, बेदाणा, शेंगदाणे, तळून घ्यावेत. नंतर आयत्या वेळी भातावर बटाटे, काजू, दाणे, बेदाणा, नारळ व कोथिंबीर पालून शोभिवंत करावा. या प्रकारे व्हेजिटेबल बिर्याणी बनवा.

(Vegetable biryani recipe in marathi) 

हे पण वाचा,

Chicken Roast Recipe Marathi | चिकन रोस्ट रेसिपी बनवायला शिकणार आहोत

चिकन मसाला | Chicken Masala Recipe in Marathi | 5 पद्धतीने बनवा

चिकन टिक्का | Chicken Tikka Recipe in Marathi – Marathi Recipe

चिकन चिली | Chicken Chilli Recipe In Marathi

मटण बिर्याणी रेसिपी | Mutton Biryani Recipe In Marathi

Ingredients for Vegetable Biryani

2 cups rice, 1 cup mugachi dal, 3 medium potatoes, 3-4 orange carrots, 2 tomatoes, 2 onions, 1/2 cup peas, half coconut, 1 tablespoon raisins, 5 tablespoons cashew nuts, 1 tablespoon seeds, 1 1/2 Add 3 cups curd, 1 tsp coriander-cumin powder, 1 cinnamon stick, 5-6 black pepper, 3-4 chillies, 1 handful chopped cilantro.

Vegetable Biryani Recipe?

Cook dal and rice for one hour. Peel a squash, grate it and fry it. Steam the carrots and peas. Peel a squash, grate it and squeeze the juice. Peel a squash, grate it and squeeze the juice. Do the same with your hands. Grate onion.

Finely chop onion, a little coconut flavor, chilli. Add a little water and make a thick juice. Squeeze onion and coconut husk. Only thick water should be kept. Finely chop the masala.

Now add mustard seeds, asafoetida, turmeric powder and stir well. Saute dal and rice a little. Combine thick tomato juice and coconut juice, add more water and pour over rice. This water should come at least three fingers above the rice. Add masala and salt and cook the rice.

In a large thick bowl, turn the ghee by hand, alternating a layer of rice and a layer of vegetables. Add a little water to the curd and Then cover the pan and bring the rice to a boil. When the rice is cooked, put a lid on it. Fry cashews, raisins, peanuts. Then garnish with rice, potatoes, cashews, nuts, raisins, coconut and cilantro. Make vegetable biryani this way.

(Vegetable biryani recipe in marathi) 

Conclusion

Now we have seen How to make a Vegetable Biryani Recipe (व्हेजिटेबल बिर्याणी). We learned to make (Vegetable biryani recipe in marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share. Visit Home Page.


रेसिपी Share करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published.